Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:07 IST2025-08-19T18:06:49+5:302025-08-19T18:07:11+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रकच्या केबिनमध्ये बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती जे बोलते ते ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
Truck Drive Wife Video : फिरण्याची आवड कोणाला नसते? पृथ्वी तलावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जग फिरायची आणि वेगवेगळे अनुभव घ्यायची इच्छा असते. पण अनेकदा सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांमुळे अनेकांना ही इच्छा पूर्ण करता येत नाही. विशेषकरून कामाच्या व्यापामुळे महिलांना बाहेर पडणे खूप कठीण होते. स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतंत्र होऊन हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये एका महिलेने फिरण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला आहे, जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
ट्रक ड्रायव्हरसोबतच थाटला संसार!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रकच्या केबिनमध्ये बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती जे बोलते ते ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. तिला फिरण्याचा खूप छंद होता, पण तिचे कुटुंबीय तिला बाहेर फिरू देत नव्हते. त्यामुळे तिने आपला हा छंद पूर्ण करण्यासाठी चक्क एका ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न केले.
या व्हिडीओमध्ये महिला सांगते की, "फिरण्याचा छंद पूर्ण करण्यासाठी मी एका ड्रायव्हरशी लग्न केले आहे. आता हे जिथे जिथे जातात, तिथे तिथे मी त्यांच्यासोबत जाते. अशाप्रकारे मी आता अख्खं जग फिरत आहे."
Degree 📉 Truck driver 📈 pic.twitter.com/sstEW6SOvB
— D,DEVIL 🎭 (@Redd_flaggg) August 19, 2025
पती-पत्नी दोघेही आनंदी!
जग फिरण्याचा हा मार्ग थोडा वेगळा असला तरी, इंटरनेटवर लोकांना तो खूप आवडत आहे. महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. तिचा ट्रक ड्रायव्हर पतीदेखील तिच्या बोलण्याला दुजोरा देत हसत आहे, जणू त्यालाही याच क्षणाची वाट होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक त्यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
हा व्हिडीओ 'Redd_flaggg' नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला असून अनेकांनी त्याला लाईकही केले आहे. यावर काही वापरकर्त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.