Viral Video : स्मशानभूमीत आईच्या फोटोशी गप्पा मारणाऱ्या 'या' चिमुरडीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही रडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:43 IST2026-04-02T12:41:47+5:302026-04-02T12:43:38+5:30

आई आणि मुलीचे नाते किती पवित्र असते आणि मृत्यूही या नात्यात अडथळा ठरू शकत नाही, याची साक्ष हा व्हिडिओ देतोय.

Viral Video: You too will cry after watching the video of 'this' little girl chatting with her mother's photo in the cemetery! | Viral Video : स्मशानभूमीत आईच्या फोटोशी गप्पा मारणाऱ्या 'या' चिमुरडीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही रडाल!

Viral Video : स्मशानभूमीत आईच्या फोटोशी गप्पा मारणाऱ्या 'या' चिमुरडीचा व्हिडिओ पाहून तुम्हीही रडाल!

इंटरनेटवर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात, पण काही व्हिडिओ असे असतात जे थेट काळजाला भिडतात आणि माणुसकीची जाणीव करून देतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुरडीचा हृदयद्रावक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून कोणत्याही पाषाणहृदयी माणसालाही रडू कोसळेल. आई आणि मुलीचे नाते किती पवित्र असते आणि मृत्यूही या नात्यात अडथळा ठरू शकत नाही, याची साक्ष हा व्हिडिओ देतोय.

काय आहे त्या व्हिडिओमध्ये?

हा व्हिडिओ दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर देशातील असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये एक लहान मुलगी आपल्या आईच्या थडग्यापाशी बसलेली दिसते. आपली आई आता या जगात नाही, हे समजण्याचे वयही या निरागस पोरीचे नाही. ती कबरीच्या एका उघड्या भागात जाऊन बसते आणि तिथे लावलेला आपल्या आईचा फोटो एकटक न्याहाळत राहते.

आईशी गप्पा आणि खेळण्यांचा खेळ

हृदय पिळवटून टाकणारा क्षण तेव्हा येतो, जेव्हा ही चिमुरडी आपल्यासोबत आणलेली खेळणी बाहेर काढते आणि तिथेच खेळू लागते. ती त्या फोटोकडे पाहून अशा प्रकारे गप्पा मारते, जणू काही तिची आई तिथे प्रत्यक्ष बसली आहे आणि तिला आपल्या कुशीत घेत आहे. आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ती आपल्या आईच्या फोटोला दाखवत आहे, हे दृश्य पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.


सोशल मीडियावर अश्रूंचा पूर

इन्स्टाग्रामवर एका अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत १८ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर हजारो भावूक कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटले की, "आईची जागा जगात कोणीच घेऊ शकत नाही. देवा, या लहान मुलीला हे दुःख सहन करण्याची शक्ती दे." तर दुसऱ्या एकाने लिहिले, "हा व्हिडिओ पाहून मी स्वतःचे अश्रू रोखू शकलो नाही."

आईचे प्रेम हे या जगातील सर्वात मोठे सत्य आहे आणि हा व्हिडिओ त्याचीच प्रचिती देतो. मृत्यूने शरीरे वेगळी केली असली, तरी या चिमुरडीचे मन मात्र अजूनही आपल्या आईच्या मायेच्या सावलीतच खेळत आहे.

Web Title : दिल छू लेने वाला वीडियो: बच्ची का माँ के लिए प्यार वायरल।

Web Summary : इक्वाडोर से एक दिल दहला देने वाला वीडियो सामने आया है जिसमें एक छोटी बच्ची अपनी माँ की कब्र पर जा रही है। वह खिलौनों से खेलती है और अपनी माँ की तस्वीर से बात करती है, उसे अपनी माँ की मौत का एहसास नहीं है। यह वीडियो माँ और बेटी के अटूट बंधन को दर्शाता है, जो दर्शकों को रुला देता है।

Web Title : Touching video: Little girl's love for her deceased mother goes viral.

Web Summary : A heart-wrenching video from Ecuador shows a little girl visiting her mother's grave. She plays with toys and talks to her mother's photo, unaware of her loss. The video highlights the unbreakable bond between a mother and daughter, moving viewers to tears.