Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:08 IST2025-10-31T15:02:39+5:302025-10-31T15:08:45+5:30
Business Idea Viral Video : काही मित्र फिरायला गेले आहेत. या सहलीमध्ये त्यांनी नुसती धमालच केली नाही, तर सोबतच कमाई देखील केली आहे.

Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
Business Idea Viral Video : सोशल मीडिया स्क्रोल करताना आपण अनेक व्हिडीओ बघतो. पण, असे काही व्हिडीओ असतात जे आपलं लक्ष वेधून घेतात आणि कायम लक्षातही राहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये काही मित्र फिरायला गेले आहेत. या सहलीमध्ये त्यांनी नुसती धमालच केली नाही, तर सोबतच कमाई देखील केली आहे. या ट्रीप दरम्यान त्यांना भन्नाट बिझनेस आयडिया सुचली आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली. आता त्यांचा व्हिडीओ बघून सगळेच त्यांचं कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मित्रांचा एक गट एका हिल स्टेशन फिरायला गेल्याचे दिसत आहे. एकीकडे त्यांची धमाल सुरू आहे. तर, त्यापैकी एक जण खुर्चीवर आरामात बसलेला आहे आणि तर इतर त्याच्याभोवती जमलेले आहेत. सगळे मिळून तिथेच चहा बनवत आहेत आणि सर्वजण वातावरणाचा आनंद घेत आहेत. या व्हिडीओमध्ये एक तरुण म्हणतो की, ते सगळे शिवपुरीला भेट देण्यासाठी आले आहेत. पुढे तो म्हणतो की, "जेव्हा आम्ही सकाळी लवकर उठलो तेव्हा आम्हाला दिसले की, जवळपास कोणतीही दुकाने नव्हती, चहा बनवण्यासाठी गॅस किंवा स्टोव्ह नव्हता. पण आम्हाला चहा प्यायचाच होता आणि आम्ही स्वतः चहा बनवण्यात यशस्वी झालो." आता हे ऐकून तुम्हाला वाटेल की, हे तर नेहमीचच आहे. पण, खरी गंमत तर पुढे आहे.
पुढे झालं असं काही की...
खरी गंमत सांगताना तो पुढे म्हणतो की, "असं झालं की, जेव्हा आम्ही चहा बनवत होतो, तेव्हा तिथून जाणारे काही लोक आम्हाला पाहत होते. अनेकांनी विचारलं, 'आम्हाला चहा मिळेल का?' पण आम्ही गंमतीने उत्तर दिलं की, 'हा आमचा वैयक्तिक चहा आहे.' मग त्यांच्यापैकी एकाने म्हटलं की, 'हवं तर पैसे घ्या आणि आम्हालाही एक कप चहा द्या.' तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आम्हाला वाटलं, 'याला एका छोट्या व्यवसायात का बदलू नये?'"
तो सांगतो की, त्याने त्याच ठिकाणी एक चहाचे दुकान सुरू केले. काही कप ठेवले, चहा ओतला आणि त्याची किंमत प्रति कप ४० रुपये ठेवली. या व्हिडीओत तो म्हणतो की, "सकाळपासून आम्ही १५-२० कप चहा विकला आहे." ह सांगताना सगळ्या मित्रांच्या चेहऱ्यावरही हास्य आहे.