झूम मिटींग सुरू असतानाच बायको किस करायला आली; अन् व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....
By Manali.bagul | Updated: February 21, 2021 17:10 IST2021-02-21T15:32:13+5:302021-02-21T17:10:52+5:30
wife came to kiss as the zoom meeting : नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याचा किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

झूम मिटींग सुरू असतानाच बायको किस करायला आली; अन् व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....
लॉकडाऊनंतर अनेक ठिकाणी वर्कफॉर्म होमची सुरूवात झाली. यावेळी, प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्यामुळे झूम कॉल किंवा गुगल मीटच्या माध्यमातून महत्वाच्या विषयांवर मिटींग्स घेतल्या जात होत्या. व्हिडीओ कॉल्सच्या मिटींगदरम्यान अनेकदा गोंधळ झाल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवऱ्याची झूम मीटिंग सुरू असतानाच त्याची पत्नी मध्ये येऊन त्याला किस घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Haha. I nominate the lady as the Wife of the Year. And if the husband had been more indulgent and flattered, I would have nominated them for Couple of the Year but he forfeited that because of his grouchiness! @hvgoenkahttps://t.co/MVCnAM0L3W
— anand mahindra (@anandmahindra) February 19, 2021
आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच त्याला वर्क फ्रॉम होम असा हॅशटॅगही दिलाय. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्याला हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्याही त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवर आता आनंद महिंद्रांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी या महिलेला 'वाईफ ऑफ द इयर' असं म्हटलं आहे. यावेळी ट्विटर पोस्टवर आनंद महिंद्रांनी उद्योगपती हर्ष गोयंकांनासुद्धा टॅग केलं आहे. रुपीन शर्मा यांनी १६ फेब्रुवारी रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला तुफान लाईक्स आणि कमेंट्सही आल्या आहेत. चपात्यांना थुंकी लावून लोकांना वाढायचा; समोर आला किळसवाणा प्रकार, व्हायरल होताच चोप चोप चोपलं