पत्नी अचानक घरी परतली, घाबरलेल्या पतीने प्रेयसीला 10व्या मजल्यावर लटकवले, पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:58 IST2025-12-08T11:57:29+5:302025-12-08T11:58:26+5:30
Viral Video: व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पत्नी अचानक घरी परतली, घाबरलेल्या पतीने प्रेयसीला 10व्या मजल्यावर लटकवले, पाहा Video...
Viral Video: चीनमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक महिला इमारतीच्या 10व्या मजल्यावर बाल्कनीबाहेर लटकलेली दिसतेय.
पत्नी अचानक घरी आली, प्रेयसीला लपवण्यासाठी पतीची धावाधाव...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला आपल्या कथित प्रियकराच्या फ्लॅटमध्ये होती. अचानक त्याची पत्नी घरी परतली. घाबरलेल्या प्रियकराने त्या तरुणीला थेट बाल्कनीबाहेर लटकवले. शेजारील इमारतीमधून कुणीतरी लटकलेल्या महिलेचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत महिला एका हाताने रेलिंग पकडून लटकलेली दिसतेय.
काही वेळानंतर महिलेने धाडस करुन ड्रेनेज पाइप आणि खिडक्यांना पकडून हळुहळू खाली उतरण्यास सुरुवात केली. शेवटी ती खाली असलेल्या एका फ्लॅटच्या खिडकीपर्यंत पोहोचली, तेव्हा त्या फ्लॅटमधील व्यक्तीने खिडकी उघडून तिला आत खेचले.
व्हिडिओ व्हायरल
चीनमधीलसोशल मीडियावर हा व्हिडिओ आल्यापासून इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून महिलेने केलेल्या जीवघेण्या प्रयत्नांवर चर्चा सुरू आहे. काहीजणांचे मत आहे की, येत्या काळात ही घटना महिलेकरता लज्जास्पद ठरू शकते, तर काहींनी अशा धोकादायक मार्गाने सुटका करण्याचा प्रयत्नाला मूर्खपणाचे म्हटले.