VIDEO:  जेव्हा मांजर फॅशन शोमध्ये रॅम्पवर करते 'कॅट वॉक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 14:45 IST2019-05-06T14:45:36+5:302019-05-06T14:45:43+5:30

फॅशन शोमधील मॉडेल्सचा कॅटवॉक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. पण खऱ्या खुऱ्या कॅटचा कॅटवॉक मात्र रॅम्पवर कधी बघायला मिळत नाही.

Viral Video : When cat steal the morocco fashion show | VIDEO:  जेव्हा मांजर फॅशन शोमध्ये रॅम्पवर करते 'कॅट वॉक'

VIDEO:  जेव्हा मांजर फॅशन शोमध्ये रॅम्पवर करते 'कॅट वॉक'

फॅशन शोमधील मॉडेल्सचा कॅटवॉक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. पण खऱ्या खुऱ्या कॅटचा कॅटवॉक मात्र रॅम्पवर कधी बघायला मिळत नाही. मात्र, गेल्या आठवड्यात मोरक्को फॅशन शोदरम्यान माराकेचमध्ये झालेल्या ख्रिश्चयन डायर कॅटवॉकमध्ये अचानक एक मांजर शिरली. भलेही ही मांजर चुकून रॅम्पवर आली असली तरी या फॅशन शोमध्ये सर्वात जास्त चर्चा तिचीच रंगली. 

सोशल मीडियात याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या मांजरीने लोकांची मने जिंकली आहेत. कोणतीही भीती न बाळगता ही मांजर रॅम्पवर चालत असताना पाहणे लोकांना एक वेगळा अनुभव देत आहे. लोकांना क्वचिकच असा कॅटवॉक बघायला मिळात असावा. 


एका बाजूने मॉडल्स कॅटवॉक करत येत आणि दुसऱ्या बाजूने मांजर त्यांच्या मधून जात आहे. यावेळी मॉडल्सऐवजी मांजरीनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लोक यावर फार मजेदार कमेंटही करत आहेत. 



मांजर अशाप्रकारे रॅम्पवर चालत येण्याची घटना पहिली नाहीये. याआधीही इस्तांबुलमध्ये रॅम्पवर मांजर शिरली होती.

Web Title: Viral Video : When cat steal the morocco fashion show