Ssshhhh... हॉस्पिटलमधील व्हीलचेअर अचानक चालू लागली; व्हिडीओ पाहून नेटिझन्सची झोप उडाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:05 IST2019-09-26T13:00:34+5:302019-09-26T13:05:14+5:30
तुम्हीही हॉस्पिटलमधील अनेक भीतीदायक किंवा अंगावर शहारे आणणाऱ्या घटना ऐकल्या असतील. पण तुमच्यापैकी सर्वांनीच अनुभवल्या असतीलच असं नाही.

Ssshhhh... हॉस्पिटलमधील व्हीलचेअर अचानक चालू लागली; व्हिडीओ पाहून नेटिझन्सची झोप उडाली!
हॉस्पिटल म्हटलं की, कुणालाही भीती वाटणं साहजिक आहे. तुम्हीही हॉस्पिटलमधील अनेक भीतीदायक किंवा अंगावर शहारे आणणाऱ्या घटना ऐकल्या असतील. पण तुमच्यापैकी सर्वांनीच अनुभवल्या असतीलच असं नाही. सध्या हॉस्पिटलमधील व्हिडीओ फारच चर्चेचा विषय ठरत आहे.
चंडीगडच्या एका हॉस्पिटलमधील हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ बघून लोकांचा थरकाप उडत आहे. एक रिकामी एका बाजूला ठेवलेली व्हीलचेअर आपोआप पुढे जात असल्याचं या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
चंडीगडच्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली आहे. या व्हीलचेअरवर बसून भूत फिरता होता असं एका कर्मचाऱ्याने म्हटलं. तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या सिक्युरिटी गार्डनेही दावा केला आहे की, ही व्हीलचेअर आपोआप पुढे जात होती.
तर हॉस्पिटलमधील एका दुसऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले की, 'सपाट फरशीमुळे आणि हवेमुळे ही व्हीलचेअर पुढे गेली असावी. कोणत्याही भूतामुळे नाही'. अर्थातच भूत वगैरे तर या सर्व अंधश्रद्धा आहेत. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकही हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. अनेकजण भूत-आत्मा अशा कमेंट करत आहेत.