Viral Video:सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्ही आतापर्यंत पादचारी पुलांवर दुचाकी नेल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. ज्या पुलांवर माणसांनाही चालणे कठीण जाते, अशा पुलांवर लोक दुचाकी घेऊन जातात. पण, सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या व्हिडिओत एका डोंगराळ भागातील उंच पादचारी पुलावर चक्क कार नेल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दाखवले ?सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कार चालवत नदीवरील पादचारी पुलावर घेऊन जातो. या पुलाची अवस्था पाहून तुम्ही म्हणाल की, यावर पायी चालणेही कठीण आहे. पुल इतका जीर्ण झालेला दिसतोय की, पायी चालणाऱ्यालाही भीती वाटेल. पण, कारचालक चक्क गाडी घेऊन पुलावर जातो. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी जोराने ओरडू लागते. कारचालक तिचा मामा असतो, ज्याला ती म्हणते- मामा पुलावरुन गाडी नको नेऊ, हा पादचारी पुल आहे. तिच्या आवाजात भीती स्पष्टपणे जाणवते. सुदैवाने ते लोक पुल पार करतात, कोणत्याही प्रकारची दुर्घटना होत नाही.
व्हायरल व्हिडिओ येथे पहा
हा व्हिडिओ @meinkiakaruu नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले, 'याने कटप्पा मामालाही मागे टाकले.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, २८ हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका युजरने कमेंट केली - अरे मामा, थोडी दया करा. दुसऱ्या युजरने लिहिले - हे भयानक आहे. तर, तिसऱ्याने लिहिले - हे जरा जास्तच झाले.