Video: दोन महिलांचा साडी नेसून केलेला डान्स बघाल तर बघतच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:28 IST2019-04-25T17:27:57+5:302019-04-25T17:28:02+5:30

डान्स तर अनेकजण करतात. पण काही लोकांचा डान्स करण्याच अंदाज असा असतो की, बघतच रहावा.

Viral Video : Two women in sari's dancing to Aap Jaisa Koi song | Video: दोन महिलांचा साडी नेसून केलेला डान्स बघाल तर बघतच रहाल!

Video: दोन महिलांचा साडी नेसून केलेला डान्स बघाल तर बघतच रहाल!

डान्स तर अनेकजण करतात. पण काही लोकांचा डान्स करण्याच अंदाज असा असतो की, बघतच रहावा. आपण इंटरनेटवर कित्येक लोकांचे डान्स पाहिले असतील. पण सध्या दोन महिलांच्या अफलातून डान्स सध्या धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या डान्स तर चांगला आहेच. त्यांचं कौतुक यासाठी होतंय की, त्यांनी इतका सुंदर डान्स साडी नेसून केलाय. म्हणजे अनेक महिलांना तुम्ही डान्स करताना पाहिलं असेल पण अशाप्रकारचा नक्कीच पाहिला नसेल. 


हा डान्स व्हिडीओ Mysterious Me नावाच्या ट्विटर हॅंडलवर २२ एप्रिल रोजी शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ दीड लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. तर ६ हजार लोकांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केला आहे. ज्या गाण्यावर या महिलांनी डान्स केला ते गाणं १९८० मध्ये आलेल्या परवीन बाबी यांनी परफॉर्म केलेल्या 'कुर्बानी' सिनेमातील आहे. या महिलांच्या डान्स व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत असून त्यांचं भरभरुन कौतुक केलं जात आहे. 







दोन्ही महिला बिनधास्त त्यांच्याच विश्वात रमून एन्जॉय करुन डान्स करत आहेत. त्यांच्या डान्सवरुन त्या प्रोफेशनल डान्सर असतील असं अजिबात वाटत नाही. पण तरी सुद्धा इतका सुंदर डान्स करुन त्यांनी प्रेक्षकांची मने  जिंकली आहेत. 

Web Title: Viral Video : Two women in sari's dancing to Aap Jaisa Koi song