Viral Video: हा व्यक्ती अजगराला मिठी मारत होता, व्हिडिओ पाहून यूजर्स झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 15:32 IST2022-10-09T15:32:09+5:302022-10-09T15:32:25+5:30
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.हे व्हिडिओ अनेक प्रकारचे असतात.कधी प्राण्यांचे व्हिडिओ असतात. आता सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Viral Video: हा व्यक्ती अजगराला मिठी मारत होता, व्हिडिओ पाहून यूजर्स झाले थक्क
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.हे व्हिडिओ अनेक प्रकारचे असतात.कधी प्राण्यांचे व्हिडिओ असतात. आता सोशल मीडियावर एका अजगराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपण अजगराचे नाव जरी काढले तरी आपल्या अंगावर काटा येतो. पण या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क अजगराला मिठी मारत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ १० लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. कॅलिफोर्निया येथील रेप्टाइइल ज्यू चे संस्थापक जे ब्रेवर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ब्रेवर नेहमी असे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याने अजगराला आपल्या हातात धरले आहे आणि त्याला मिठी मारताना दिसत आहे.
या व्हिडिओला त्याने "एक चित्र हजार शब्द बोलते पण असा व्हिडिओ किती सांगते,अशी कॅप्शन त्याने लिहिली आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सचा केल्या आहेत. एका नेटकऱ्याने विचारले आहे, की अजगराच्या इतक्या जवळ जाणे सुरक्षित आहे का? तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे की,अविश्वसनीय व्हिडिओ आहे हा.