VIDEO : तरूणाच्या मांडीवर जाऊन बसला विषारी साप, बघा त्याने कसा वाचवला स्वत:चा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 13:13 IST2021-11-03T13:12:21+5:302021-11-03T13:13:36+5:30
Snake Viral Video : साप त्याच्या मांडीवर बसून त्याच्याकडे एकटक बघत होता. तो पार घाबरलेला होता. साप असा बसला होता जणू तो आता हल्ला करेलच.

VIDEO : तरूणाच्या मांडीवर जाऊन बसला विषारी साप, बघा त्याने कसा वाचवला स्वत:चा जीव
Social Viral : ज्या सापाला दूरूनच बघून थरकाप उडतो, तो साप जर मांडीवर येऊन बसला तर? म्हणजे नुसता विचार करूनच अंगावर शहारा येतो. एका तरूणासोबत असंच काही झालं. साप त्याच्या मांडीवर बसून त्याच्याकडे एकटक बघत होता. तो पार घाबरलेला होता. साप असा बसला होता जणू तो आता हल्ला करेलच.
विषारी साप तरूणाच्या मांडीवर बसून तरूणाकडे एकटक बघत होता. अशात तरूण जराही हलू शकत नव्हता. जर तो जराही हलला असता वा मोठा श्वास घेतला असता तर सापाने हल्ला केला असता. तरूण बराचवेळ तसाच दगड बनून बसून राहिला, तेव्हा काही वेळाने साप बाजूने निघून गेला.
OMFG!!! Thought everyone should see this. pic.twitter.com/nNKl3bdsrC
— Jamie Gnuman197... (@Jamie24272184) November 2, 2021
@Jamie24272184 यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात बघू शकता की, साप कशाप्रकारे तरूणाच्या मांडीवर बसतो. तेव्हा तो जराही हलत नाही. अखेर तो सापाला बारीक काडीने सापाला स्पर्श करतो. मग साप त्याच्या मांडीवरून बाजूला निघून जातो. तेव्हा तरूण पटकन उठून बाजूला होऊन आपला जीव वाचवतो.