इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी, दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. याच दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली, जी लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. एका गायकाने त्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स जोडण्यासाठी त्याच्या पॅन्टला आग लावली होती. पण यामुळे तोच अडचणीत सापडल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आग जसजशी पसरत गेली तसतसा गायकाचा संयम तुटू लागला. त्याच्या संपूर्ण पँटला आग लागली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सुरुवातीला हे सर्व एन्जॉय करणारा गायक अखेर आग विझवण्यासाठी त्याची पँट काढायला सुरुवात केली. आगीने रौद्र रुप धारण करताच गायक घाबरला.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना मोठा धक्का बसला, काहींना ते मजेदार वाटलं तर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी हा स्टंट फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आला होता आणि तो उद्देश साध्य झाला असं म्हटलं आहे.
रील्ससाठी अनेक लोक वाटेल ते करतात. अशा अनेक धक्कादायक घटना याआधी देखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फक्त एका रील आणि काही व्ह्यूजसाठी एका युजरने धक्कादायक कृत्य केलं आहे. लहान मुलाला एका खुर्चीवर बसवलं आणि त्याच्या अंगावर साप सोडला. सोशल मीडियावर हा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून बरीच चर्चा रंगली होती.