Viral Video: बकऱ्यासोबत सेल्फी घेत होता तरूण, नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:38 AM2021-10-15T10:38:01+5:302021-10-15T10:39:34+5:30

Social Viral Video : सेल्फीचा एक असाच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल हे नक्की....

Viral Video : Selfie with goat funny viral video | Viral Video: बकऱ्यासोबत सेल्फी घेत होता तरूण, नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल...

Viral Video: बकऱ्यासोबत सेल्फी घेत होता तरूण, नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल...

Next

Social Viral Video :  आजकाल लोकांमध्ये सेल्फीची बरीच क्रेझ राहते. लोकांना जिथे संधी मिळते ते सेल्फी घेऊ लागतात. अनेकदा तर सेल्फी घेण्याच्या नादात मोठमोठ्या घटना घडतात. अनेकदा लोकांसोबत असं झालं, जे बघून लोक पोट धरून हसले. सोशल मीडियावर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सेल्फीचा एक असाच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल हे नक्की....

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती बकऱ्यासोबत सेल्फी घेत होता. पण व्यक्तीसोबत जे झालं ते बघून लोक जोरजोरात हसत आहेत. तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका बकऱ्यासोबत बिनधास्तपणे सेल्फी घेताना दिसत आहे. मधेमधे तो बकऱ्यासोबत काही बोलतही आहे. ज्यावर त्याला बकऱ्याकडून मजेदार उत्तरही मिळतं. व्हिडीओ पाहून असं वाटतं की, बकरा जणून सेल्फी घेण्याच्या मूडमद्ये नाही. त्यामुळे त्याच्या पद्धतीने नकार देतो. 

हा व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच तुम्हालाही मजा येईल. आता हा व्हिडीओ मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ '@ViralHog' ने शेअर केलाय. लोकांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे. यातील क्यूट बकरा बघून लोक खूश झाले आहेत. तुम्हीही हा मजेदार व्हिडीओ बघा आणि हसून दिवस चांगला घालवा.
 

Web Title: Viral Video : Selfie with goat funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app