Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:06 IST2025-06-08T14:05:36+5:302025-06-08T14:06:35+5:30

Groom Dance Viral : कधी कधी नाचताना असा काही अतिरेक होतो की, पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

Viral Video : Seeing his sister-in-law, he lost control, the groom danced on stage! The video is going viral | Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

आपलं लग्न खास असावं आणि ते प्रत्येकाच्या लक्षात राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. भारतीय लग्नांमध्ये तर नृत्य, संगीत आणि धमाल यांना वेगळंच महत्त्व असतं. प्रत्येकजण आपल्या परीने लग्नातील क्षण खास बनवण्याचा प्रयत्न करत असतो, विशेषतः वर आणि त्याचे मित्रमंडळ यात अग्रेसर असते. पण कधी कधी नाचताना असा काही अतिरेक होतो की, पाहणाऱ्यांना हसू आवरत नाही. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वराच्या अतिउत्साही डान्सने सगळ्यांनाच हसवलं आहे. 

मेहुणीला पाहून बेभान झाला नवरदेव
या व्हिडीओत एक लग्नसोहळा सुरू आहे, पाहुणे आनंदात आहेत, आणि संगीताच्या गजरात सर्व वातावरण उल्हासाने न्हाऊन निघालं आहे. त्याच वेळी, वराची मेहुणी एक सुंदर पांढऱ्या लेहेंग्यात स्टेजवर एन्ट्री घेते आणि नाचायला लागते. तिचा डान्स पाहताच नवरदेव स्वतःला आवरू शकत नाही आणि तोही स्टेजवर उडी मारून तिच्यासोबत नाचायला सुरुवात करतो.


मजेशीर गोष्ट म्हणजे, वराच्या नृत्यशैलीत एकदम वेगळाच जोश आहे, इतका की त्याला पाहून पाहुणेही थक्क होतात. त्याचा जोश, उत्साह आणि स्टेजवरील धमाल डान्स पाहून लोक थक्क झाले. काही क्षणातच ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आणि ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागली.

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
नवरदेवाचा हा धमाल व्हिडीओ 'chotuyadav3231' या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि तो आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केला आहे, तर लाखो लोकांनी पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी मजेदार प्रतिक्रिया देत वराच्या उत्साहावर आपले व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिलं, "भाऊ, त्याला काहीतरी सांगा, त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसतोय!" तर दुसऱ्याने टोकाचा विनोद करत लिहिलं, "याचमुळे ब्रिटिश भारतातून निघून गेले असावेत!"

Web Title: Viral Video : Seeing his sister-in-law, he lost control, the groom danced on stage! The video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.