Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 09:51 IST2025-07-31T09:47:11+5:302025-07-31T09:51:45+5:30

Social Viral Video : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं लोकांचं मन जिंकलं आहे. या व्हिडीओमध्ये एक बांधकाम कामगार घराचं बांधकाम करताना दिसत आहे.

Viral Video: Salute to your stubbornness! He is doing construction even without hands; Netizens praised him after watching the video | Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Handicap Worker Viral Video : सोशल मीडियाच्या या जगात कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. पण, कधीकधी असे व्हायरल व्हिडीओ बघायला मिळतात, जे पाहून इंटरनेटचं बील भरत असल्याचं समाधान वाटतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं लोकांचं मन जिंकलं आहे. या व्हिडीओमध्ये एक बांधकाम कामगार घराचं बांधकाम करताना दिसत आहे. आता तुम्हाला वाटेल की यात काय वेगळं आहे? पण, व्हिडीओ बघितल्यावर लक्षात येईल की, या कामगाराला हात नाहीत. 

हात नसताना देखील हा दिव्यांग कामगार आपल्या तोंडाने विटा उचलून बांधकाम करत आहे. हा व्हायरल व्हिडीओ खरोखरच खूप प्रेरणादायी आहे, ज्यामध्ये एक गवंडी दोन्ही हात नसतानाही आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर 'ही क्लिप छोट्या छोट्या गोष्टींसाठी सबबी सांगणाऱ्यांनी पाहावी', असे नेटकरी म्हणत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गवंडीला दोन्ही हात नाहीत, पण तरीही तो त्याचे काम करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
  
पाहा व्हिडीओ : 

या गवंडी काम करणाऱ्या मजुरला दोन्ही हात नसून, तो आपल्या खांद्यांच्या आणि हातांच्या मदतीने विटा उचलतो. त्यावर सिमेंट लावतो आणि नंतर अतिशय कुशलतेने भिंत बांधण्याचे काम सुरू करतो. तो माणूस त्याचे काम इतक्या चपळतेने करतो की, ते पाहून लोक आश्चर्यचकित होतात. 

लोक करतायेत कौतुक!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'inderjeetbarak' नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. हजारो लोक तो व्हिडीओ पाहून, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, या माणसाच्या धाडसाचे खरोखर कौतुक करायला हवे. दुसऱ्याने व्हिडिओवर कमेंट केली आणि लिहिले की, "या माणसाचा आत्मविश्वास निश्चितच कौतुकास्पद आहे." दुसऱ्याने लिहिले की, "घराची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला अशा परिस्थितीत काम करण्यास भाग पाडते, ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल."

Web Title: Viral Video: Salute to your stubbornness! He is doing construction even without hands; Netizens praised him after watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.