Viral video posted by diljit dosanjh know the reality of snake catching prank | Video : शेतातून बाहेर काढत होता साप अन् पुढे जे झालं...

Video : शेतातून बाहेर काढत होता साप अन् पुढे जे झालं...

साप पाहिला रे पाहिला की बोंबा-बोंब सुरू होते. अनेकांना तर साप फक्त स्क्रिनवरच पाहायला आवडतो. पण चुकून जर समोर आला तर मात्र भलतीच भंबेरी उडते. एवढचं नाहीतर अनेकांना तर नावानेच कापरं भरतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक सापाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. 

सापाचा हा व्हिडीओ एक प्रँक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शेतातील साप आपल्या हातांनी पकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो.

व्हिडीओमध्ये आजूबाजूला घाबरलेल्या लोकांचे आवाजही येत आहेत. या सर्व गोष्टीतून ही व्यक्ती घाबरत तो साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यानं शेतातून काढलेला हा साप पाहून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल. 

व्हिडीओमध्ये शेतातून साप काढलेला व्यक्ती एक बेल्ट बाहेर काढतो आणि आपल्या पॅन्टला लावतो. हा व्हिडीओ म्हणजे, फसवणूकीचा कळस असल्याचे म्हटलं जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral video posted by diljit dosanjh know the reality of snake catching prank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.