Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:53 IST2025-06-26T10:51:34+5:302025-06-26T10:53:05+5:30

Flight Passenger Viral Video: विमानातून प्रवास करताना प्रवाशाच्या लज्जास्पद कृत्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे.

Viral Video: Passenger got Caught Allegedly Stealing life jacked on Flight | Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!

Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!

बस आणि रेल्वेच्या तुलनेत विमानाचा प्रवास अधिक आरामदायी आणि गतिमान आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात विमानातून प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. परंतु, विमानातून प्रवास करताना प्रवाशाच्या लज्जास्पद कृत्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रवाशाला विमानातून लाईफ जॅकेट चोरताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला फटकारले. त्यावेळी विमानातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

हा व्हिडिओ @travel.instaagram नावाच्या हँडलवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि एक हजारांहून जणांनी लाइक्स केले आहे. या व्हिडिओत विमानातील कर्मचारी संबंधित प्रवाशाकडे येतात आणि त्याला बॅग उघडायला सांगतात. त्यावेळी त्याच्या बॅगेत लाईफ जॅकेट आढळून येते. त्यानंतर विमानातील कर्मचारी संबंधित प्रवाशाला ओरडतात. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, भाऊ, तू याचे काय करणार? दुसऱ्याने म्हटले आहे की, तू विमानात रेल्वेसारखे कृत्य कशाला करतात? तिसऱ्याने म्हटले आहे की, त्याला वाटले असेल की, हा रेनकोट आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला सांगतो की, विमानातून लाईफ जॅकेट चोरणे हा एक गंभीर गुन्हा आहे. 

५० हजारपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा
हा व्हिडीओ इंडिगो फ्लाइटचा असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना कोणत्या मार्गावर किंवा फ्लाइटवर घडली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.  डीजीसीए आणि विमान कंपन्यांच्या नियमांनुसार, हे सुरक्षा उल्लंघन आहे आणि त्यासाठी ५० हजारपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Viral Video: Passenger got Caught Allegedly Stealing life jacked on Flight