VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:19 IST2025-09-26T14:13:50+5:302025-09-26T14:19:37+5:30
माल है चोखा, प्यार में नहीं मिलेगा धोखा... फेरीवाल्याचा भन्नाट अंदाज! ऐकून तुम्हालाही खरेदी करावीच वाटेल

VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रेनमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी विकणाऱ्या एका तरुणाने आपल्या अनोख्या शैलीने लोकांची मने जिंकली आहेत. शायराना आणि अत्यंत मजेशीर अंदाजात हा तरुण आपले प्रॉडक्टस विकत आहे. त्याच्या यमक जुळणाऱ्या शब्दांनी आणि संवादांनी नेटकऱ्यांना इतकं प्रभावित केलं आहे की, त्यांनी या तरुणाला हुशार व्यावसायिक अशी उपाधी दिली आहे.
नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?
बस आणि ट्रेनमध्ये अनेक फेरीवाले आणि विक्रेते येतात, पण काहीजण आपल्या वस्तू अशा खास पद्धतीने विकतात की, ते प्रवाशांचे मनोरंजनही करतात. या व्हायरल व्हिडीओमध्येही असंच एक दृश्य पाहायला मिळालं. गर्दीच्या जनरल डब्यात आर्टिफिशियल ज्वेलरी विकणाऱ्या या तरुणाने आपल्या खास बोलण्याच्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
सोने से कम नहीं, खो जाए कोई गम नहीं!
या तरुणाचे डायलॉग्स सोशल मीडिया युजर्सला खूप आवडले आहेत. आपल्या दागिन्यांची गुणवत्ता सांगताना तो म्हणतो, "सोनार बनाएगा नहीं और चोर चुराएगा नहीं... सोने से कम नहीं, खो जाए कोई गम नहीं!" अर्थात सोनार हे दागिने बनवणार नाही आणि चोर ते चोरणार नाही. पण हे सोन्यापेक्षा कमी नाही, आणि हरवले तरी काही दुःख नाही.
यासोबतच, साखळीची गुणवत्ता दाखवण्यासाठी तो एका प्रवाशाला ती घासून तपासण्यासाठी देखील देतो. याचवेळी, एका प्रवाशाने किंमत कमी करण्याची मागणी केली, तेव्हा तरुणाचं उत्तर आणखी मजेदार होतं. तो म्हणाला, "५० रुपयांत आणखी काय देऊ, माझं काळीजही काढून देऊ का?" यापुढे तो म्हणतो, "माल है चोखा, प्यार में नहीं मिलेगा धोखा!" अर्थात सामान एकदम उत्कृष्ट आहे, प्रेमात धोका मिळेल पण इथे नाही!
'टॅलेंटेड बिझनेसमॅन' म्हणून कौतुक!
या तरुणाचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 'liveforfood007' या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत २१ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तरुणाची वस्तू विकण्याची आणि प्रवाशांना गुंतवून ठेवण्याची कला पाहून नेटिझन्सनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.