अरे वाह रे वाह! बाइकवरचा असा स्टंट याआधी नक्कीच पाहिला नसेल, फक्त बघा ट्राय करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 18:38 IST2022-07-19T18:37:05+5:302022-07-19T18:38:45+5:30
Trending On Instagram: एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात एक व्यक्ती बाइकसोबत हैराण करणारे कर्तब दाखवत आहे. हे इतकं वेगळं आहे की, पुन्हा पुन्हा बघावं वाटतं.

अरे वाह रे वाह! बाइकवरचा असा स्टंट याआधी नक्कीच पाहिला नसेल, फक्त बघा ट्राय करू नका!
Trending On Instagram: सोशल मीडियावर मनोरंजन होईल अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात. अनेक व्हिडीओ-फोटो व्हायरल होत असतात. जे बघून हसून हसून पोट दुखतं. काही गोष्टी तर अशा असतात ज्या पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा होते. काही व्हिडीओ तर चक्रावून सोडणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात एक व्यक्ती बाइकसोबत हैराण करणारे कर्तब दाखवत आहे. हे इतकं वेगळं आहे की, पुन्हा पुन्हा बघावं वाटतं.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती काळा चष्मा लावून मोठ्या स्वॅगमध्ये बाइक चालवताना दिसत आहे. ही व्यक्ती बाइकच्या मदतीनेच एकाच जागी गोल गोल फिरत आहे. तुम्ही बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल. हा अजब व्हिडीओ पाहून अनेकांचं डोकं चक्रावून गेलं आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. आतापर्यंत या व्हिडीओला 15 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लाखो लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. कारण लोकांनी अनेक स्टंट पाहिले, पण असा पाहिला नाही. अर्थातच त्याने यासाठी खूप प्रॅक्टिस केली असेल, त्यामुळे अशाप्रकारचा स्टंट तुम्ही ट्राय करू नका. याने तुमचं नुकसान होऊ शकतं.