बदल्याचा कडक Video! महिलेने चप्पल फेकून मारली, साप ती घेऊन पळाला; एकदा पहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 23:23 IST2022-11-24T23:23:01+5:302022-11-24T23:23:29+5:30
सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

बदल्याचा कडक Video! महिलेने चप्पल फेकून मारली, साप ती घेऊन पळाला; एकदा पहाच...
सापाला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडते. सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सापाला घराच्या पायऱ्यांवर येत असल्याचे पाहून एका महिलेने त्याला घाबरवण्यासाठी पायातील चप्पल फेकून मारली. साप हीच चप्पल घेऊन पळाला आहे.
सापाने ती चप्पल तोंडात पकडली आणि ती घेऊन पळाला आहे. महिला ऐ...ऐ करत बसली होती. या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे ते अद्याप समजलेले नाही.
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. याचे कॅप्शन त्यांनी लिहीले आहे, आता साप या चपलाचे करणार काय आहे? त्याला तर पायही नसतात. ही व्हिडीओ क्लिप आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. लोक त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.एकाने तर हा बिहारचा साप असावा असे म्हटले आहे. इथले नेता आणि साप रिकाम्या हाती कधी जात नाहीत, असे तो म्हणाला आहे.
पहा हा व्हिडीओ...
I wonder what this snake will do with that chappal. He got no legs. Unknown location. pic.twitter.com/9oMzgzvUZd
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 24, 2022