शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हात-पाय नव्हे, या अवयवाने केला टायपिंगचा विक्रम ! Viral व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:01 IST

एखादा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.

Social Viral : एखादा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. नुकताच एका भारतीयाने यापेक्षा जरा वेगळा विक्रम केला आहे. हा विक्रम आहे हाता-पायांचा वापर न करता शरीराच्या इतर अवयवांचा वापर करून टायपिंग करण्याचा. 

विनोद कुमार चौधरी असे त्यांचे नाव आहे. त्यांनी चक्क नाकाचा वापर करून टायपिंग केले आहे. गेल्यावर्षी त्यांनी २७.८० सेकंदांत इंग्रजी वर्णमाला टाइप केली. दुसऱ्यांदा त्यांनी यासाठी २६.७३ सेकंद घेतले. यावेळी त्यांनी २५.६६ सेकंदांतच वर्णमाला टाइप केली. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा नाकाने टायपिंग करण्याचा वेग पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. सध्या विनोद कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विनोद चौधरी आपल्या नाकाच्या साहाय्याने इंग्रजी वर्णमालेतील अक्षरे टाईप करताना दिसत आहेत. शिवाय जीडब्ल्यूआरने या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना एक प्रश्न देखील विचारला आहे. आपल्या नाकाच्या मदतीने तुम्ही किती स्पीडने अक्षरे टाईप करू शकता?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसोबत संवाद साधताना विनोद म्हणाले,  "माझा  पेशा टायपिंग करणं आहे. त्यामुळेच मी नव-नवीन रेकॉर्डस बनवायची माझी इच्छा आहे. ज्याच्या माध्यमातून माझी आवड आणि उदरनिर्वाह देखील होईल. माझं असं म्हणणं की आयुष्यात कितीही संकटे आली तरी खचून न जाता आपली आवड जपा. त्याचबरोबर ते, म्हणाले, सध्या 'टायपिंग मॅन ऑफ इंडिया' या नावाने लोक मला ओळखतात आणि हा किताब जिंकण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहे. नाकाने टायपिंग करत असताना बऱ्याचदा मला चक्कर देखील येते डोळ्यांभोवती अंधार येतो", असा खुलासा देखील त्यांनी केला. 

या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट्स करत विनोद चौधरी यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ पाहून "Very Nice Brother" अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे तर त्यावर आणखी एक जण म्हणतो, "My friend could of done this..." अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड