VIDEO: मालकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांशी भिडला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 20:41 IST2023-10-29T20:40:48+5:302023-10-29T20:41:21+5:30

Viral Video Of Dog Saving his Owner: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video Of Dog Saving His Owner: VIDEO: Dog Clashes With Attackers Attacking Owner; video went viral | VIDEO: मालकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांशी भिडला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल...

VIDEO: मालकावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांशी भिडला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल...

Viral Video Of Dog Saving his Owner:कुत्रा आणि माणसाचे नाते सर्वश्रृत आहे. कुत्र्याला माणसाचा सच्चा मित्र मानतात. कुत्रा कधीच आपल्या मालकाची साथ सोडत नाही. कुठल्याही कठीण परिस्थितीत कुत्रा साथ देतो. जगभरात अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यात कुत्र्यांनी आपल्या मालकाचा जीव वाचवला आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या पाळीव कुत्र्यासोबत रस्त्यावर फिरतोय, रस्तावर लोकंही दिसत नाहीत. यावेळी दोन बाईकस्वार तिथे येतात, एक व्यक्ती बाईकवरुन उतरतो आणि त्या माणसावर हल्ला करण्याच्या प्रयत्न करतो. यावेळी कुत्रा हल्लेखोरावर तुटून पडतो. कुत्र्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने हल्लेखोर घाबरतो आणि आपल्या साथीदारासह पळून जातो.

X वर फिगेन @TheFigen_ ने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यू मिळाले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले- खरंच कुत्रा माणसाचा सर्वात प्रामाणिक मित्र आहे. दुसऱ्याने लिहिले- कुत्र्याने त्या हल्लेखोराला चावायला पाहिजे होते. 

Web Title: Viral Video Of Dog Saving His Owner: VIDEO: Dog Clashes With Attackers Attacking Owner; video went viral