VIDEO : या चिमुकलीने खास अंदाजात केला जवानांचा सन्मान, बघून कराल तिचं भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:22 IST2022-07-16T13:20:39+5:302022-07-16T13:22:48+5:30
Respect To Soldiers: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, काही सेनेचे जवान मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. तेव्हाच एका चिमुकली त्यांच्याजवळ धावत जाते. त्यानंतर जे झालं ते बघून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे.

VIDEO : या चिमुकलीने खास अंदाजात केला जवानांचा सन्मान, बघून कराल तिचं भरभरून कौतुक
Respect To Soldiers: सोशल मीडिया सध्या एक व्हिडीओ लोकांना खूपच पसंत पडला आहे. लोक भरभरून हा व्हिडीओ शेअऱ करत आहेत. एका छोट्या मुलीने भारतीय जवानांचा असा काही सन्मान केला की, सगळेजण तिचं भरभरून कौतुक करत आहेत. तुम्हीही कधीना कधी पाहिलं असेल की, आपल्या समोरून अनेकदा सेनेचे जवान जातात, काही लोक त्यांना सल्यूट करतात. काही लोक लक्षही देत नाहीत. पण या चिमुकलीने जे केलं ते पाहून सगळेच इमोशनल झालेत.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, काही सेनेचे जवान मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. तेव्हाच एका चिमुकली त्यांच्याजवळ धावत जाते. त्यानंतर जे झालं ते बघून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे. मुलगी धावत जाते आणि एका जवानाच्या पाया पडते. हे बघून जवान देखील सरप्राइज होतात.
कोई पूछे संस्कार क्या होता है,उसे ये Video दिखा दो .. संस्कार उम्र से बड़े है बिटिया रानी के❤️❤️ pic.twitter.com/AK3fhpcWkp
— Ravi Ranjan (@RaviRanjanIn) July 15, 2022
हे तर सर्वांनाच माहीत आहे की, सीमेवर जवान उभे आहेत म्हणून आपले परिवार सुरक्षित आहेत. तरीही लोक आपल्या या जवानांना हवा तसा सन्मान देत नाहीत. ही चिमुकली आपणा सर्वांसाठी एक उदाहरण आहे. तिने त्यांचा सन्मान केला आणि इतरांनाही हे सांगितलं की, आपण काय करायला हवं. या चिमुकलीच्या पालकांचंही कौतुक केलं जात आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ शेअर करून सर्वांना आपल्या लेकरांना असंच शिकवलं पाहिजे असंही सांगत आहेत. सोबतच या चिमुकलीचं कौतुक करत आहेत.