Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:21 IST2025-11-05T16:21:09+5:302025-11-05T16:21:37+5:30
या नववधूचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिने गुपचूप आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी खोलीत बोलावले होते.

Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
सोशल मीडियाच्या जगात दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेला एक व्हिडिओ पाहून लोक थक्क झाले आहेत. एका नवविवाहित जोडप्याच्या घरात लग्नानंतर मोठा राडा झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. नवरीच्या बेडमध्ये लपलेल्या तिच्या प्रियकराला कुटुंबीयांनी पकडल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर 'लग्नाच्या नावाखाली होणारा हा विश्वासघात कधी थांबणार,' अशा चर्चांना उधाण आलं आहे.
नवरीच्या खोलीत नेमके काय घडले?
हा व्हायरल व्हिडिओ एका घरात सुरू असलेल्या गोंधळाचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक एका खोलीत गोंधळ घालत आहेत आणि आतमध्ये कुणालातरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सेकंदांनंतर घरातलं वातावरण अचानक तणावपूर्ण होतं. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, ही घटना एका नवीन लग्नाच्या घरात घडली आहे.
नववधूवर संशय आल्यामुळे सासरच्या लोकांनी तिच्या खोलीची आणि बेडची तपासणी सुरू केली. कुटुंबीयांनी जेव्हा बेड उघडून पाहिला, तेव्हा नवरीचा प्रियकर त्या बेडमध्ये लपून बसलेला दिसला आणि तो अचानक बाहेर आला.
Extra-Marital affair Kalesh (This guy got caught hiding inside Bed at his Married Girlfriend's Place) pic.twitter.com/DdaFYMLFyT
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 5, 2025
हातातील काठ्यांनी केली प्रियकराची तुफान धुलाई!
प्रियकर बाहेर येताच खोलीत एकच हाहाकार माजतो. खोलीत लाठीकाठी घेऊन उभ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्या तरुणाला तुफान मारहाण करायला सुरुवात केली. वेदनेने तो तरुण जोरजोरात ओरडू लागतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या नववधूचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिने गुपचूप आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी खोलीत बोलावले होते.
युजर्सचा संताप शिगेला
हा व्हिडिओ 'gharkekalesh' नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, अनेक युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिले की, "जर यालाच बोलावून भेटायचं होतं, तर याच मुलाशी लग्न करायला हवं होतं." दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे, "अशा मुलींमुळेच लोक लग्न करायला घाबरतात." "लोक प्रेमासाठी काय काय करत नाहीत," अशी प्रतिक्रिया एका युजरने नोंदवली आहे.