Viral Video: मोबाइल खेळत असलेल्या चिमुकलीसोबत माकडाचं भांडण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 18:35 IST2021-11-12T18:26:56+5:302021-11-12T18:35:58+5:30
Social Viral : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एक माकड आणि एक लहान मुलगी आहे. यात माकड आणि मुलीतील भांडण बघायला मिळतं.

Viral Video: मोबाइल खेळत असलेल्या चिमुकलीसोबत माकडाचं भांडण, व्हिडीओ व्हायरल
Social Viral : माकड जर आजूबाजूला असेल तर थोड सतर्क राहण्याची गरज असते. कारण तो आपल्या मस्तीखोर अंदाजाने कुणालाही परेशान करू शकतात. सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडीओ आहे. जे बघितल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत एक माकड आणि एक लहान मुलगी आहे. यात माकड आणि मुलीतील भांडण बघायला मिळतं.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओत एक लहान मुलगी खाटेवर बसली आहे आणि स्मार्टफोन बघत आहे. तेव्हा अचानक तिच्याजवळ एक माकड येतं आणि ते तिच्या हातातील फोन हिसकावून घेतं. काही सेकंदात मुलगीही माकडाकडून फोन हिसकावून घेते. हे बघून माकड अवाक् होतं आणि पुन्हा तिच्याकडून मोबाइल घेऊन घट्ट पकडतो. सुदैवाने माकड मुलीला काही इजा करत नाही.
व्हिडीओच्या शेवटपर्यंत माकड फोन तसाच हातात पकडून राहतो. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना फारच आवडला आहे. लोक या व्हिडीओवर कमेंट करत आहेत आणि लाइक्स करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ४५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.