Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:17 IST2025-12-04T14:16:23+5:302025-12-04T14:17:25+5:30
Mumbai Man Surprise his Parents: मुंबईतील एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना नवीन फ्लॅट भेट देऊन सरप्राईज केले.

Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
मुंबईतील एका तरुणाने आपल्या आई-वडिलांना नवीन फ्लॅट भेट देऊन सरप्राईज केले. या तरुणाने आपल्या पालकांना भाड्याचे घर दाखवण्याच्या बहाण्याने नव्याने सजवलेल्या फ्लॅटमध्ये नेले. परंतु, दारावर आपल्या नावाची पाटी पाहून आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता त्याने हे आपलेच घर असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकताच आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या कपाळावर चुंबन घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जैन, असे तरुणाचे नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये आशिष जैन आपल्या आई वडिलांसोबत एका सजवलेल्या फ्लॅटमध्ये उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो अचानक त्यांना घराची कागदपत्रे आणि दरावर लावलेल्या नेमप्लेटवर त्यांचे नाव असल्याचे दाखवतो. कागदपत्रे आणि घराच्या पाटीवर आपली नावे पाहताच पालकांना आश्चर्याचा धक्का बसतो. मुलगा जेव्हा हे घर आपले आहे, असे सांगतो, तेव्हा दोघांनाही अश्रू अनावर होतात. आनंदाने भारावून गेलेले वडील त्याला घट्ट मिठी मारतात आणि लगेच त्याच्या कपाळावर चुंबन घेतात. मग त्याची आईही त्याला मिठी मारते.
आशिष जैन यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'सर्वकाही' असे लिहिले. आतापर्यंत या व्हिडीओला ८.७ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पासून नेटकरी देखील भावूक झाले आहेत. या हृदयस्पर्शी व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे.