Video : 'तो' कापणार इतक्यात माकड केक घेऊन झालं रफूचक्कर.....तो राहिला बघत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 13:06 IST2019-12-23T13:06:18+5:302019-12-23T13:06:37+5:30
तुम्ही माकडांचे कारनामे असलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा नक्कीच पाहिला नसेल.

Video : 'तो' कापणार इतक्यात माकड केक घेऊन झालं रफूचक्कर.....तो राहिला बघत...
तुम्ही माकडांना लोक काहीतरी खायला देतांनाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण काही लोक असेही आहेत जे माकडांपासून दोन हात दूरच राहतात. कारण माकडं कधी काय करतील याचा काही नेम नसतो. ते कधी मोबाइल घेऊन पसार होतात तर कधी कपडे फाडतात. अशात एक याहूनही मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात माकड एका व्यक्तीचा बर्थ डे केक घेऊन पळालाय.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती त्याच्या बर्थ डे केक कापतो आहे. अशात अचानक एक माकड येतं आणि त्या व्यक्तीचा अख्खा केक घेऊन झाडावर चढतं. एका दुसऱ्या व्यक्तीने माकडाला रोखण्याचा प्रयत्नही केला, पण काही फायदा झाला नाही.
He saw his chance and took it 😂😂😂 pic.twitter.com/7CJIe4GSni
— Ffs OMG Vids 📽🔞 (@Ffs_OMG) December 16, 2019
हा मजेदार व्हिडीओ @Ffs_OMG नावाच्या ट्विटर यूजरने ट्विट केला आहे. १७ डिसेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. तेव्हापासून तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर सात हजारपेक्षा जास्त लाइक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.