VIDEO: माकडाची हुशारी! जखमी झाल्यावर स्वत:हून मेडिकलमध्ये आलं, बँडेजदेखील बांधून घेतलं ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:02 IST2025-03-13T17:01:38+5:302025-03-13T17:02:29+5:30
Monkey First Aid Viral Video: माकडदेखील शांतपणे गोंधळ न घातला उपचार करून घेत होतं...

VIDEO: माकडाची हुशारी! जखमी झाल्यावर स्वत:हून मेडिकलमध्ये आलं, बँडेजदेखील बांधून घेतलं ...
Monkey First Aid Viral Video: जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडं मानवी वस्तीतही येतात. ते जेव्हा एकत्र असतात, तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. पण एखादं माकड चुकून मानववस्तीत आलं तर लोक त्याला त्रास देतात किंवा इजा करतात. काही लोक त्याला दगडंही मारण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे माकड जखमी होऊ शकते. पण सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पूर्णपणे वेगळाच आहे. कारण या व्हिडीओत माकड स्वतः उपचार घेण्यासाठी मानवी वस्तीत असलेल्या मेडिकलमध्ये येते आणि शांतपणे उपचार करून घेते.
ही व्हायरल घटना बांगलादेशातील मेहेरपूर येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक माकड स्वतःवर उपचार करण्यासाठी स्वतःहून एका केमिस्टच्या दुकानात पोहोचते आणि केमिस्टला नीट जखम दाखवते. केमिस्ट त्या माकड्याच्या जखमेवर अँटीसेप्टिक लोशन आणि मलम लावतो. यावेळी आसपास बरेच लोक असतात. ते लोक लहानशा माकडाला धीर देत असतात. व्हिडिओच्या शेवटी, केमिस्ट त्या माकडाच्या जखमेवर बँडेजदेखील बांधतो. माकडदेखील शांतपणे गोंधळ न घातला उपचार करून घेते. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर pia.bengaltigress नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. लोक यावर मनापासून व्यक्त होताना दिसत आहेत. माकड हा प्राणी उड्या मारणारा असला तरीही त्याला नीट माया लावली तर तो माणसांशीही नीट वागतो, गोंधळ गडबड करत नाही, हेच या व्हिडीओतून दिसून येते, अशा प्रकारच्या कमेंट्स युजर्स करताना दिसत आहेत. तसेच, अनेकांनी या माकडाच्या हुशारीचेही कौतुक केले आहे.