Viral Video : गॅंग बनवून किंग कोब्रावर मुंगसांनी केला होता हल्ला, नंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:08 IST2022-04-29T13:08:20+5:302022-04-29T13:08:31+5:30
Meerakt fight Cobra Video: सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Viral Video : गॅंग बनवून किंग कोब्रावर मुंगसांनी केला होता हल्ला, नंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही!
Meerakt fight Cobra Video: साप आणि मुंगसाचं वैर वर्षानुवर्षे चालत आलं आहे. सापाला बघताच मुंगूस त्याच्यावर हल्ला करतं. सापाला मारण्यासाठी मुंगूस त्याच्यावर तुटून पडतं. किंग कोब्रासारख्या विषारी सापाला बघूनही मुंगूस मागे हटत नाही आणि त्याला जीवे मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतो. सोशल मीडियावर असाच एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओत बघू शकता की एक किंग कोब्रा जंगलात फिरत होता. यादरम्यान मीरकॅट म्हणजे आफ्रिकी मुंगूस गॅंग बनवून कोब्रावर हल्ला करतात. पण व्हिडीओच्या शेवटी जे होतं ते बघून त्यावर कुणाचा विश्वास बसत नाही. इतकं नक्की की व्हिडीओ बघून तुम्ही थक्क व्हाल. मीरकॅट हे मुंगूस दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आढळून येतं. ही मुंगसाची एक वेगळी प्रजाती आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बरेच मुंगूस गॅंग बनवून जंगलात फिरत असलेल्या किंग कोब्रावर हल्ला करतात. किंग कोब्रा दिसताच सगळे मुंगूस त्याच्यासोबत पंगा घेऊ लागतात. दुसरीकडे खतरनाक किंग कोब्राही तेवढ्याच ताकदीने पलटवार करतो. अशात मुंगसांनी चारही बाजूने किंग कोब्राला वेढलेलं आहे. अशात ते पुन्हा पुन्हा हल्ला करतात.
व्हिडीओ बघून तुमच्या लक्षात येईल की, मुंगसाच्या गॅंगने प्लान करून किंग कोब्राला वेढा दिला होता. चारही बाजूने मुंगूस असूनही किंग कोब्रा काही मागे हटायला तयार नव्हता. तो मुंगसांना सडेतोड उत्तर देतच होता. तुम्ही बघू शकता की, किंग कोब्रा त्यांना घाबरवून सोडतो. अखेर असं होतं ज्यावर कुणाचा विश्वास बसत नाही.