Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:39 IST2025-11-04T17:39:16+5:302025-11-04T17:39:57+5:30
Uttar Pradesh Wedding Video: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका लग्नसमारंभात जेवण बनवताना रोट्यांवर थुंकल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला.

Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका लग्नसमारंभात जेवण बनवताना रोट्यांवर थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दानिश नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर एका लग्नसमारंभातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यात आरोपी रोट्या बनवताना त्यावर थुंकताना दिसत आहे. हा संतापजनक प्रकार पहासू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला, ज्याचा व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजवीर सिंग यांनी दिली.
Another case of "Thook Jihad" has come to light in Bulandshahr, UP, where a person making rotis at a Dalit wedding ceremony is seen spitting on the roti. The police have arrested the person.
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 4, 2025
The accused's name is Danish. pic.twitter.com/5PMnpOvpK1
उत्तर प्रदेशातील वाढत्या घटना
बुलंदशहरची ही घटना अशा प्रकारची पहिली नाही. अलीकडच्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशात अशाच प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑगस्टमध्ये बागपत येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका भोजनालयात रोट्यांवर थुंकल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याआधी मे आणि फेब्रुवारी महिन्यात मेरठमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जेवण बनवताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या पुरुषांनी असेच घाणेरडे कृत्य केले होते.