Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 13:49 IST2021-02-05T13:40:56+5:302021-02-05T13:49:09+5:30
Trending Viral News in Marathi : व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या एका काकांनी केलेल्या जादूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video : काकांनी बॉल तोंडात टाकताच केला असा चमत्कार; कधीही पाहिली नसेल असली भन्नाट जादू
लहानपणी जादू सगळ्यांनीच पाहिलेली असते. जादूगारीची कला हे अनेकांच्या रोजगाराचं साधन असते. सोशल मीडियावर एका काकांचा आश्चर्य चकीत करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी जादू तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बॉल आणि शिक्क्याचा वापर करून हे काका जादू करत आहेत. हा व्हिडीओ पाहताना पाहणाऱ्याचे डोळे उघडेच राहतात. ही जादू पाहून या काकांना अजून प्रसिद्धी मिळावी असं नेटिझन्सनी म्हटलं आहे.
Let's make him famous 👏 Amazingly talented 🙌🏼👌🏼😊 #IncredibleIndianpic.twitter.com/dL7MA7rP6V
— Ankit Vora (@iankitvora) February 4, 2021
हा व्हिडीओ ट्विटर युजर @iankitvora यांनी ४ फेब्रुवारीला शेअर केला होता. या व्हिडीओवर त्यांनी लिहिले की, चला या काकांना अजून प्रसिद्ध करूया, शानदार टॅलेंट! त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना #Incredibleindia असा हॅशटॅग वापरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरूवातीला हे काका एक लहानसा बॉल घेऊन जादू दाखवायला सुरूवात करतात. त्यानंतर शिक्क्याचा वापर करून एक जबरदस्त ट्रीक वापरून जादू केलेली पाहायला मिळते . कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहत असाल लाल रंगाच्या लहान बॉलचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून २७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांना या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे काका कर्नाटकातील उड्डपीमधील असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स चक्रावून गेले आहेत तसंच एका मोकळ्या रस्त्यावर हे काका लोकांना ही जादू करून दाखवत आहेत. कॅमेरात कैद झाला शिकारीच्या तयारीत असलेला दुर्मिळ काळा बिबट्या; पाहा रुबाबदार बिबट्याचे फोटो