शाब्बास रे पठ्ठ्या! वासराला वाचवण्याची तरूणाची धडपड, व्हिडीओ बघून कराल कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:33 IST2025-03-04T11:32:39+5:302025-03-04T11:33:08+5:30
Viral Video : नाल्यात पडलेल्या गायीच्या वासराला बाहेर काढण्यासाठी एका तरूणाची धडपड या व्हिडिओत बघायला मिळते.

शाब्बास रे पठ्ठ्या! वासराला वाचवण्याची तरूणाची धडपड, व्हिडीओ बघून कराल कौतुक!
Viral Video : जगात आजही माणूसकी जिवंत असल्याचा पुरावा देणाऱ्या घटना वेळोवेळी समोर येत असतात. या घटना बघून लोकांनाही मदतीची प्रेरणा मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नाल्यात पडलेल्या गायीच्या वासराला बाहेर काढण्यासाठी एका तरूणाची धडपड या व्हिडिओत बघायला मिळते. या वासराला बाहेर काढण्यासाठी तरूणानं पूर्ण ताकद लावली असल्याचं बघू शकता.
व्हिडिओत बघू शकता की, तरूण काही लोकांच्या मदतीनं नाल्यात पडलेल्या वासराला बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दोराच्या माध्यमातून वासराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यात यश न मिळाल्यानं तरूणानं थेट नाल्यात उडी घेतली आणि वासराला सुरक्षित बाहेर काढत त्याचा जीव वाचवला.
इन्स्टाग्राम अकाऊंट veera singam वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला २१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. Its alive असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर लोक या तरूणाचं भरभरून कौतुक करत आहेत. एका यूजरनं लिहिलं की, हीच खरी माणूसकी आहे आणि जगाला अशा लोकांची खूप गरज आहे. तर अनेकांनी गायीला वाचवल्याबद्दल त्याचे धन्यवादही मानले.
हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला. खरंतर जगात प्राण्यांवर प्रेम करणारे खूप लोक आहेत. पण रस्त्यावर जर एखादा प्राणी अडचणीत असेल तर त्याची मदत करायला क्वचितच कुणी जातं. मात्र, या तरूणानं त्या धाडसानं या गायीला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला तो खरंच कौतुकास्पदच आहे.