VIDEO : पॅराग्लायडिंगची अशीही भीती, ओरडला नाही थेट बेशुद्ध आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 13:22 IST2023-09-15T13:20:08+5:302023-09-15T13:22:14+5:30
Viral Video : व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी हेच म्हटलं की, इतकी भीती वाटते तर मग पॅराग्लायडिंग कशाला करायची?

VIDEO : पॅराग्लायडिंगची अशीही भीती, ओरडला नाही थेट बेशुद्ध आणि मग...
Viral Video : लोकांचे पॅराग्लायडिंग करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. काही लोक यावेळी इतके घाबरतात की, जोरजोरात ओरडू लागतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात व्यक्ती इतका घाबरला की, ओरडणं तर दूर तो थेट बेशुद्ध झाला. व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी हेच म्हटलं की, इतकी भीती वाटते तर मग पॅराग्लायडिंग कशाला करायची?
या व्हिडिओच्या सुरूवातीला बघू शकता की, एक व्यक्ती पॅराग्लायडिंगला खूप घाबरला. त्याचं तोंड उघडं आहे, तर त्याच्यासोबत असलेला गाइड हसत आहे. त्याला हे माहीत नव्हतं की, व्यक्ती बेशुद्ध झाली आहे. तेव्हा त्याचं डोकं खालच्या दिशेने झुकतं. त्याला लगेच खाली उतरवलं जातं. गाइड त्याचं डोकं वर करतो आणि मग व्यक्ती जोरजोरात ओरडू लागतो.
fainted from excitement in the air pic.twitter.com/k7X80jze05
— Enezator (@Enezator) September 13, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Enezator नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 75 हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 1500 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक हा व्हिडीओ रिट्विट करत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.