Viral Video : little girl backflip video like wheel viral on social media | कमाल! पंख्यापेक्षा अधिक वेगानं गोलगोल फिरत राहिली चिमुरडी, Backflip Video तुम्हीही जाल चक्रावून

कमाल! पंख्यापेक्षा अधिक वेगानं गोलगोल फिरत राहिली चिमुरडी, Backflip Video तुम्हीही जाल चक्रावून

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात.  काही व्हिडीओ पाहून माणसांचे मनोरंजन होते. तर काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या बॅक फ्लिपचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एखाद्या पंख्यापेक्षा जास्त वेगानं गोल गोल फिरत या मुलीनं बॅकफ्लिप मारले आहेत. 

बॅकफ्लिप मारणं वाटतं तेव्हढं सोपं नाही. अनेकांना यामुळे गंभीर दुखापतही होऊ शकते. कुणाला तोंडाला लागू शकतं, कुणाच्या पाठीच्या कण्याला मार लागू शकतो. त्यामुळे ब्लॅकफ्लिप मारणं सर्वांनाच जमतं असं नाही. योग्य  प्रक्षिक्षण घेतलं असल्यास बॅकफ्लिप मारणं उत्तम ठरतं.  फार फार तर चार-पाच बॅकफ्लिप मारताना तुम्ही लोकांना पाहिले असेल. पण या चिमुरडीने इतके बॅकफ्लिप मारले आहेत की व्हिडीओ पाहणाऱ्याला तर ते मोजणंही शक्य नाही.

 बोंबला! स्विमिंग पूलमध्ये अनोखळी मुलीशी बोलायला गेला; पत्नीनं पाहताचं केलं असं काही, पाहा व्हिडीओ

रॅक्स चॅपमॅन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक छोटीशी मुलगी एका बेडवरून बॅकफ्लिप करत थोड्या अंतरावर पुढे जाते. त्यानंतर एकाच जागेवर ती बॅकफ्लिप मारते.  अनेक युझर्स तिने किती बॅकफ्लिप मारले हे मोजण्याचा प्रयत्न करतात. अनेकांनी त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मला देवही पकडू शकत नाही तर पोलीस काय...', असं चॅलेंज देणाऱ्या 'खोपडी'ला पोलिसांनी दिलं होतं सडेतोड उत्तर...

आतापर्यंत लाखो लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून ४७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.  कुणी म्हटलं आपल्याला आता चक्कर येते आहे, काहींनी आपली पाठ दुखल्याचं सांगितलं आहे. या चिमुरडीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral Video : little girl backflip video like wheel viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.