VIDEO : शिकारीच्या तयारीत असलेल्या वाघाला जिराफाकडून दे धक्का, अशी केली धुलाई की बघतच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 14:58 IST2021-04-24T14:55:13+5:302021-04-24T14:58:58+5:30
एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक वाघ शिकार करण्याच्या नाादात स्वत:च मार खातो.

VIDEO : शिकारीच्या तयारीत असलेल्या वाघाला जिराफाकडून दे धक्का, अशी केली धुलाई की बघतच रहाल!
वेगवेगळ्या प्राण्यांमधील लढाई बघण्याासाठी प्रत्येकजण आतुर असतो. याचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या लढाईचा शेवट कधी भयावह तर कधी मजेदार होताना बघायला मिळतो. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक वाघ शिकार करण्याच्या नाादात स्वत:च मार खातो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
इंटरनेटवर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ज्यात एका मोकळ्या मैदानात जिराफाला आपल्याकडे धावत येताना बघून वाघ अलर्ट होतो आणि जिराफावर हल्ला करण्याचा विचार करतो. पण हा हल्ला वाघाला स्वत:वर भारी पडेल याचा जराही अंदाज नव्हता. वाघापेक्षा तीन पटीने उंची जिराफ जेव्हा वेगाने धावत सुटतो तेव्हा वाघ हल्ला करणार असतो. पण जिराफ इतक्या वेगाने धावतो की, वाघाला लाथांनी तुडवत जातो.
वाघाला जराही अंदा नव्हता की, त्याचा प्लॅन त्याच्यावर उलटेल. वाघ हा तसा मोठा शक्तीशाली प्राणी समजला जातो. पण कधी कधी वाघालाही मार खावा लागतो हे या व्हिडीओत बघायला मिळतं. प्रत्येकवेळी वाघ जिंकतो असं नाही. इतर प्राणीही इतरांना धडा शिकवू शकतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक मजेदार कमेंटही करत आहेत.