सोशल मीडियावर कधी काही पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. असाच एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोच्या माध्यमातून पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतींना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो एका कारच्या मागच्या बाजुचा आहे, जिथे 'पुरुष अधिकार संघर्ष मोर्चा' असे लिहिण्यात आले आहे. त्याच्या बाजुला पुरुषांसाठी एक हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे आणि असे लिहिण्यात आले आहे की, "जर तुमची पत्नी तुम्हाला त्रास देत असेल तर आम्हाला सांगा." हा फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे? याबद्दल माहिती मिळू शकली नाही. परंतु,आता हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
Jeejaji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यत बऱ्याच लोकांनी हा फोटो पाहिला असून खूप लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, भाऊ, त्याला त्याच्या पत्नीने त्रास दिला असेल. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, मी नंबर सेव्ह करून ठेवतो, लग्नानंतर उपयोगी पडेल. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, किमान कोणीतरी पुरषांबद्दल विचार करत आहे. आणखी एका वापरकर्त्याने म्हटले आहे की, भाऊ, कॉल उचलत नाहीये, त्याच्या बायकोने त्याला पकडले आहे का?