VIDEO : पत्नीला उचलून नाचण्यासाठी उतावळा होता पती, उचलायला तर गेला पण; हसून हसून पोट दुखेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 15:59 IST2021-12-08T15:58:42+5:302021-12-08T15:59:13+5:30
Social Viral : आता जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो लग्नाचा नाही तर डान्स फ्लोरवरील आहे. इथे डान्स करत असताना एका कपलसोबत असं काही होतं की, बघून सगळेजण पोट धरून हसू लागले आहेत.

VIDEO : पत्नीला उचलून नाचण्यासाठी उतावळा होता पती, उचलायला तर गेला पण; हसून हसून पोट दुखेल
सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लोक आवडीन त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करतात. या व्हिडीओजमध्ये कधी नवरी-नवरदेवाची मस्ती दिसते तर कधी नवरीसोबत दीर किंवा नवरदेव मेहुणींसोबत असं काही करतात जे बघून लोक पोट धरून हसतात. असाच एक व्हिडीओ (Social Viral Video) सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आता जो एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो लग्नाचा नाही तर डान्स फ्लोरवरील आहे. इथे डान्स करत असताना एका कपलसोबत असं काही होतं की, बघून सगळेजण पोट धरून हसू लागले आहेत.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पती-पत्नी दोघेही एका लग्नात डान्स फ्लोरवर डान्स करत असतात आणि ‘तेरे बिन नहीं लगदा दिल मेरा’ हे गाणं सुरू असतं. तेव्हाच अचानक पती डान्स फ्लोरवर आपल्या पत्नीला उचलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा हा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरतो. तो त्याच्या पत्नीला उचलू शकत नाही. त्यामुळे बॅलन्स बिघडतो आणि मग दोघेही खाली पडतात.
Pyaar utna karo jitna sambhal sako
— NB (@nitbatta) December 6, 2021
😁😁 pic.twitter.com/HX9cQod9Zy
हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लोक मजेदार कमेंट्सही करत आहेत. ज्यात काही म्हणाले की, यातून इतर लोकांनी शिकायला पाहिजे. हा व्हिडीओ हेही दाखवतो की, पती-पत्नीचं नातं सतत एकमेकांना साथ देण्यासाठी आहे. दोघे एकमेकांना सांभाळतात. आनंदी राहतात.