Video : अचानक गाडीच्या बोनेटवर चढला 17 फुटांचा अजगर अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 16:22 IST2019-10-01T16:15:23+5:302019-10-01T16:22:34+5:30
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. एका कच्च्या रस्त्यावर एक लॅन्ड रोवर गाडी उभी आहे. अजगर टायरवरून गाडीच्या बोनेटवर गेला.

Video : अचानक गाडीच्या बोनेटवर चढला 17 फुटांचा अजगर अन्...
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. सध्या साउथ आफ्रिकेतील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मोठा अजगर गाडीवर चढला आहे. जसं हा अजगर गाडीवर चढला तसे गाडीच्या आतमध्ये बसलेले लोक हैराण झाले. एका कच्च्या रस्त्यावर एक लॅन्ड रोवर गाडी उभी आहे. अजगर टायरवरून गाडीच्या बोनेटवर गेला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
रिपोर्ट्सनुसार, मोजाम्बिकवरून सुट्टी एन्जॉय करून पर्यटक परत येत होते. रस्त्यामध्ये त्यांचा सामना एका मोठ्या अजगराशी झाला. गाडी उभी होती, अजगर गाडीच्या दिशेने येत होता. कॅमेरामॅनने अजगराची शेवटी पकडून त्याला मागच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते शक्य झालं नाही. अजगर गाडीच्या वर चढून आला.
ड्रायवरने लगेच गाडी मागच्या बाजूला घेतली. परंतु, अजगर काही गाडीच्या समोरून बाजूला झाला नाही. तो पुन्हा गाडीच्या बाजूने जाऊ लागला. गाडी फार मागे गेल्यानंतर अजगर आजूबाजूच्या झाडांमध्ये निघून गेला.
काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक साप चालत्या गाडीमध्ये चढला होता. दोन लोक गाडीमध्ये होती. साप विंडशील्डवर जाऊन बसला. आतमध्ये बसलेल्या एका माणसाने वायपरच्या मदतीने सापापासून सुटका मिळवली.