Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:44 IST2025-10-28T17:32:45+5:302025-10-28T17:44:21+5:30
केवळ २८ सेकंदांचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने झोप उडवणारा आहे, कारण यामुळे ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या पॅकेजिंगच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड
महागडे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे इंटरनेटवरील पब्लिक थक्क झाली आहे. या व्हायरल क्लिपमध्ये एक व्यक्ती चक्क आयफोन १७ प्रो-मॅक्सच्या बॉक्सवरील सील न तोडता, अगदी सहजपणे काढताना दिसत आहे. केवळ २८ सेकंदांचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने झोप उडवणारा आहे, कारण यामुळे ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या पॅकेजिंगच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सीलबंद डब्यात जुना किंवा नकली फोन?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दाखवतो की, ॲपलसारख्या जागतिक कंपन्यादेखील फसवणुकीच्या शिकार होऊ शकतात. जे ग्राहक ऑनलाईन महागडे फोन ऑर्डर करतात, त्यांना सीलबंद डब्यातही जुना, वापरलेला किंवा अगदी नकली फोन मिळण्याची शक्यता या व्हिडीओमुळे वाढली आहे.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीची ओळख आणि ठिकाण अद्याप समजू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने त्याने सील पॅक्ड डब्बा न तोडता सहजपणे उघडला आहे, त्याने लोकांच्या चिंता मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेत. लोक या गोष्टीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत की, इतक्या महागड्या फोनची सर्वात सुरक्षित मानली जाणारी 'सील' देखील सुरक्षित राहिली नाही.
This viral video shows how do people commit fraud with new phones?
— Sarahh (@Sarahhuniverse) October 27, 2025
© Reddit (gautammobile01) pic.twitter.com/3FCefgvclV
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया साइट एक्सवर 'Sarahhuniverse' या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत तो १ कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
ग्राहकांचा विश्वास डगमगला!
अर्थातच, ग्राहक ॲपलसारख्या महागड्या ब्रँडवर विश्वास ठेवून जास्त पैसे खर्च करतात. कारण, त्यांना खात्री असते की, सीलबंद डब्यात त्यांना १००% नवीन फोनच मिळेल. मात्र, या व्हायरल क्लिपमुळे सीलबंद पॅकेजिंगच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ब्रँड्सना आवाहन केले आहे की, त्यांनी आपली पॅकेजिंग आणि सील आणखी मजबूत करावी, जेणेकरून कोणीही त्यात छेडछाड करू शकणार नाही. एका युजरने तर दावा केला आहे की, त्याने ॲमेझॉनवरून सीलबंद 'पिक्सल फोन' मागवला होता, पण त्याचे सॉफ्टवेअर खूप जुने होते. युजरने याला थेट 'स्कॅम' म्हटले आहे.