Viral Video : कधी सापाला अंड्यातून बाहेर येताना पाहिलं का? नसेल पाहिलं तर आता बघा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:25 PM2021-10-14T17:25:03+5:302021-10-14T17:27:40+5:30

Viral Video :  आम्ही तुमच्यासाठी असाच एक तुम्हाला हैराण करणारा व्हिडीओ आणला आहे. तुम्ही सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील, पण फार क्वचित लोकांनी सापाला अंड्यातून बाहेर येताना पाहिलं असेल.

Viral Video : Have you ever seen a snake coming out of an egg, if not then you must watch this viral video | Viral Video : कधी सापाला अंड्यातून बाहेर येताना पाहिलं का? नसेल पाहिलं तर आता बघा...

Viral Video : कधी सापाला अंड्यातून बाहेर येताना पाहिलं का? नसेल पाहिलं तर आता बघा...

Next

Viral Video : जर तुम्ही रोज तुमच्या मोबाइलवर रील्स किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ बघत असाल तर तुम्ही फनी आणि अनोखे व्हिडीओ बघितले असतील. सोशल मीडियावर तुम्हाला नेहमीच काही अजब व्हिडीओ बघायला मिळतात. जे बघण्याची तुम्ही कधी कल्पनाही केल नसेल. असाच  एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

आम्ही तुमच्यासाठी असाच एक तुम्हाला हैराण करणारा व्हिडीओ आणला आहे. तुम्ही सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील, पण फार क्वचित लोकांनी सापाला अंड्यातून बाहेर येताना पाहिलं असेल. हाच नजारा तुम्हाला या व्हिडीओत बघायला मिळतो. पक्ष्यांचे पिल्लं अंड्यातून बाहेर येताना बघायला मिळतात. पण सापाचं तसं नाही. साप अंधाऱ्या जागेत किंवा बिळात अंडी देतात. त्यामुळे त्यांची पिल्लं बाहेर येताना बघायला मिळत नाहीत.

या व्हिडीओची सुरूवात एका सापाच्या अंड्याने होते आणि त्यातून एक सुंदर साप निघताना दिसतो. त्यानंतर व्हिडीओत मंत्रमुग्ध कऱणारे दृश्य समोर येतात. ज्यात छोटे साप तो भागात विभागलेली जीभ दाखवतो आणि त्याची चमकती त्वचा दिसते.

हा व्हिडीओ चेस्टर झू ने  इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका सापाच्या पिल्लाच्या जन्मासोबतच त्याचे अविश्वसनीय दृश्य बघायला मिळणं ही सुद्धा मोठी बाब आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केलाय. 
 

Web Title: Viral Video : Have you ever seen a snake coming out of an egg, if not then you must watch this viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app