Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:41 IST2025-07-22T15:39:53+5:302025-07-22T15:41:40+5:30
Snake Yawn Viral Video: अजगराचा जबडा उघडताना दिसतो तेव्हा एक क्षण थबकायला होतं...

Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
Snake Yawn Viral Video: सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटमध्येही सोशल मीडियाला खूप जास्त महत्त्व आले आहे. एखाद्या छोटाशा शहरात किंवा गावात घडलेली छोटीशी घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. काही वेळा एखादा व्हिडीओ व्हायरल होतो, तर कधी एखादे गाणे किंवा एखादा ट्रेण्ड व्हायरल होते. सध्याही सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील दृश्य इंटरनेट युजर्सना थक्क करून सोडणारे आहे. या व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर जांभई देताना दिसत आहे. हे दृश्य इतके दुर्मिळ आहे की, असे दृश्य फारच क्वचित पाहायला मिळते. यामुळेच हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @lauraisabelaleon नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये, एक प्रचंड मोठे अजगर जांभई देताना दिसतो. जांभई देताना अजगर जेव्हा जबडा उघडतो, त्यावेळी एखाद्या माणसाला धडकी भरेल इतका मोठा 'आ' करताना दिसतो. कॅमेऱ्यात टिपण्यात आलेले हे दृश्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने नेटिझन्सना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणेही भाग पडले आहे. पाहा व्हिडीओ-
हा व्हिडिओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला आहे. आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे आणि ही संख्या सतत वाढत आहे. त्याच वेळी, कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया उत्सुकता आणि आश्चर्याने भरलेल्या आहेत.