कमालच! घराच्या छतावरून नवरदेवावर उडवले २० लाख रूपये, व्हिडीओ बघून लोक अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:51 IST2024-11-21T10:50:50+5:302024-11-21T10:51:34+5:30
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतक दावा करण्यात आला आहे की, पाहुण्यांनी वरातीत नवरदेवावर २० लाख रूपयांची रक्कम अशीच उडवली.

कमालच! घराच्या छतावरून नवरदेवावर उडवले २० लाख रूपये, व्हिडीओ बघून लोक अवाक्!
Viral Video : लग्न हा सगळ्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्वाच्या क्षणांपैकी एक असतो. लग्न सोहळे वेगवेगळे पद्धतीने पार पाडले जातात. यात वेगवेगळे रितीरिवाज तर असतातच, सोबतच लग्न यादगार करण्यासाठी इतरही अनेक गोष्टी केल्या जातात. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधील एका वरातीचा अवाक् करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, पाहुण्यांनी वरातीत नवरदेवावर २० लाख रूपयांची रक्कम अशीच उडवली. यात तुम्ही बघू शकता की, नवरदेवाकडील लोक इमारतीच्या छतावर उभे राहून नोटा हवेत उडवत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, वरातीत दिसणारे पाहुणे नवरदेवाकडील होते. वरातीदरम्यान काही पाहुणे घराच्या छतावर चढले तर काही जेसीबीवर चढले. त्यांनी 100 रूपये, 200 रूपये आणि 500 रूपयांच्या नोटा हवेत उडवल्या. खाली पडलेल्या नोटा गावातील लोक उचलत होते. असं सांगण्यात येत आहे की, हा व्हिडीओ अफजल आणि अरमाननच्या लग्नाचा आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणाले की, पैसे गरजू लोकांना दिले गेले पाहिजे. तर काही लोक गमतीने म्हणाले की, चांगलं काम, कमीत कमी काही गरीब लोकांना पैसे तर मिळाले. असं पुन्हा पुन्हा करत रहा.