Video : दुबई एअरपोर्टवर ठेवली आहे सोन्याची वीट; हात टाका आणि घेऊन जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:48 IST2019-03-28T13:44:25+5:302019-03-28T13:48:22+5:30

सोन्याची वीट तेही फुकट म्हटल्यावर कुणीही ती घ्यायला कुणीही तयार होईल. अशीच एक सोन्याची वीट दुबईच्या एअरपोर्टवर ठेवण्यात आली आहे.

Viral video of gold bar Dubai airport people are getting mad on this | Video : दुबई एअरपोर्टवर ठेवली आहे सोन्याची वीट; हात टाका आणि घेऊन जा!

Video : दुबई एअरपोर्टवर ठेवली आहे सोन्याची वीट; हात टाका आणि घेऊन जा!

सोन्याची वीट तेही फुकट म्हटल्यावर कुणीही ती घ्यायला कुणीही तयार होईल. अशीच एक सोन्याची वीट दुबईच्या एअरपोर्टवर ठेवण्यात आली आहे. बस ही वीट उचलायची आहे आणि ही वीट तुमची होईल. पण ही वीट मिळवणे इतकेही सोपे नाही. 


ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ दुबई एअरपोर्टच्या गोल्ड बारचा आहे. इथे एक २० किलो वजनची सोन्याची वीट ठेवली आहे. ही वीट एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवली आहे. या बॉक्सला एक हात जाईल एवढं छिद्र आहे. हात टाका आणि सोन्याची वीट काढा. पण व्हिडीओत बघायला मिळत आहे की, ही वीट काढताना लोकांच्या नाकी नऊ आले आहेत. पण एकाने हा कारनामा करून दाखवला आहे. 



 



 



 


एकतर या विटेचं वजन फार जास्त आहे आणि काचेच्या बॉक्सला असलेलं छिद्र फार लहान आहे. त्यातून ही वीट काढणं जरा कठीणच आहे. त्यामुळे प्रयत्न तर सगळेच करतात पण यश काही कुणाला मिळताना दिसत नाही. 

Web Title: Viral video of gold bar Dubai airport people are getting mad on this