"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..." मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:52 IST2025-10-04T16:51:25+5:302025-10-04T16:52:38+5:30
Viral Breakup Video: एका मुलीने बिट्टू नावाच्या तरुणासोबत ब्रेक झाल्यानंतर आपल्या भावना अत्यंत तीव्रतेने व्यक्त केल्या.

"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..." मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
सध्याच्या काळात नातेसंबंध आणि ब्रेकअपच्या घटना अत्यंत सामान्य झाल्या आहेत. अनेकदा एका व्यक्तीच्या विश्वासघातामुळे दुसऱ्या व्यक्तीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका मुलीने बिट्टू नावाच्या तरुणासोबत ब्रेक झाल्यानंतर आपल्या भावना अत्यंत तीव्रतेने व्यक्त केल्या आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक मुलगी म्हणते की, "अरे, बिट्टू, एखाद्याला एकटं सोडताना तुला कसं वाटतं? मी मरणार नाही, मी मरणारी मुलगी नाही. मी आतून खूप हट्टी आहे. तू जितकं मला रडवलं आहेत, तू देखील तितकाच रडशील, माझ्या मित्रा. मी तुझ्यासाठी काय केले नाही. तरीही तू माझा झाला नाहीस. एक सत्य गोष्ट सांगते, तू कुठल्याच मुलीचा होऊ शकणार नाहीस.
Bittu game khel gaya pic.twitter.com/XmgpwZ8oNX
— Hannah 🩷 (@Clay_521) October 3, 2025
हा व्हिडिओ @Clay_521 नावाच्या अकाउंटवरून एक्स प्लॅटफॉर्मवर "बिट्टूने खेळ केला" या कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून, यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या मुलीच्या भावनांशी सहानुभूती व्यक्त केली आहे. तर, काहीजण बिट्टूला लक्ष्य करत आहेत. एका व्यक्तीने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, बिट्टूने ताइची फसवणूक केली. तर, दुसऱ्याने लिहिले आहे की, बिट्टू तू ताईसोबत योग्य वागला नाही. तर, काही जण गंमतीने बिट्टूला नक्कीच पश्चात्ताप होईल, असे म्हणत आहेत.