VIDEO : सिगारेट पेटवून विषारी सापाजवळ गेली तरूणी, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:12 IST2022-03-17T16:10:21+5:302022-03-17T16:12:02+5:30
Viral Video : तरूणीचा व्हिडीओ बघून सोशल मीडिया यूजर्स विचारात पडले आहेत. कारण या तरूणीने फारच बहादुरी दाखवत सापाला पकडलं.

VIDEO : सिगारेट पेटवून विषारी सापाजवळ गेली तरूणी, मग जे झालं ते पाहून व्हाल अवाक्...
Viral Video : साप पकडणं हे काही लहान मुलांचा खेळ नाही. अनेक साप पकणारेही यांचे शिकार होतात. तुम्ही अशा अनेक घटनांबाबत ऐकलं असेल की, विषारी साप पकडताना सर्पमित्रांनाही जीव गमवावा लागला. याउलट सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी विषारी सापाला पकडताना दिसत आहे.
तरूणीचा व्हिडीओ बघून सोशल मीडिया यूजर्स विचारात पडले आहेत. कारण या तरूणीने फारच बहादुरी दाखवत सापाला पकडलं. तिने रस्त्यावर फिरत असलेल्या सापाला ज्याप्रकारे पकडलं आणि रस्त्याच्या बाजूला केलं ते बघून सगळेच हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ ब्राझील असल्याचं सांगितलं जात आहे. यात एका तरूणीने अजिबात न घाबरता सापाला पकडलं आणि बाजूला केलं.
व्हिडीओत बघू शकता की, रस्त्याच्या मधोमध एक साप बसलेला आहे. सापाला बघून ये-जा करणारे लोक जरा घाबरलेले आहेत. तेव्हा तिथे एक तरूणी येते. आधी तर ती सापाकडे आधी निरखून बघते. नंतर सिगारेट पेटवून सापाजवळ जाते. त्यानंतर पटकन सापाला पकडले आणि रस्त्याच्या कडेला नेऊन सोडते.
तरूणीचा हा कारनामा पाहून तेथील लोक अवाक् होता. हा व्हिडीओ unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. एका यूजरने लिहिलं आहे की ब्राझीलच्या जबोटिकटुबासमध्ये हा साप आढळला होता. त्याला नुकसान पोहोचू नये म्हणून जॅकली नावाच्या महिलेने त्याला पकडून बाजूला केलं.