Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:45 IST2025-10-02T16:41:57+5:302025-10-02T16:45:35+5:30
Viral News: सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
चांगला मित्र नेहमी आपल्या सुख-दुःखात सोबत उभा राहतो. संकटाच्या वेळी भावनिक आणि नैतिक आधार देणारा तो पहिला व्यक्ती असतो. पण आपली संगत चुकली की, त्याचे अनेकांना वाइट परिणाम भोगावे लागतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मित्र आपल्या तिसऱ्या मित्राला एका मुलीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करतात. "जास्तीत जास्त ती काय करेल? नाही बोलेल," असे सांगून ते त्याला तयार करतात. त्यांच्या प्रोत्साहनाने तो मित्र तिच्याशी बोलण्यासाठी तयार होतो. हा मित्र मुलीच्या अगदी जवळ पोहोचताच, पुढच्याच क्षणी सर्व काही बदलते. त्याच्या दोन्ही मित्रांनी त्याला मागून ढकलले. त्यानंतर तो समोर बसलेल्या मुलीच्या अंगावर पडतो. त्यानंतर संतापलेली मुलगी तिच्या हातातील चहा किंवा कॉफी त्या मुलाच्या चेहऱ्यावर फेकते.
Matter khatam ho gaya pic.twitter.com/9OYrpF0fMQ
— Bhumika (@sankii_memer) September 30, 2025
@sankii_memer नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ५० हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने असा मित्र नसणे चांगले, अशी कमेंट केली. तर, दुसऱ्या व्यक्तीने असे लिहिले की, "मुलावर अचानक हल्ला झाला."