शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Viral Video: फायर ब्रिगेड विसरा, या तंत्रज्ञानाने काही मिनीटात आग आटोक्यात येणार, पहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:19 IST

एखादी इमारत किंवा कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग आटोक्यात आणतात. पण, आता यासाठी एका नवीन तंत्रज्ञनाचा वापर होत आहे.

Viral Video: एखादी इमारत किंवा कुठल्याही परिसरात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ आग आटोक्यात आणतात. पण, काहीवेळा अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास थोडा वेळ होतो. अशा स्थितीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय उंच इमारतीत आग लागल्यास ती विझविण्यातही अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. पण, आता या सर्व अडचणी तंत्रज्ञानाद्वारे दूर केल्या जाणार आहेत.

तंत्रज्ञनाच्या मदतीने आगीवर नियंत्रणअग्निशमन दलाच्या जवानांना पटकन आणि सुरक्षितरित्या आग विझविण्यात यावी, यासाठी तंत्रज्ञानाने समस्येवर उपाय शोधला आहे. यामुळे आआता आगही काही मिनिटांतच विझवली जाईल आणि कुणाला इजाही होणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आग विझवताना दाखवण्यात आले आहे.

आग विझविण्यासाठी ड्रोनचा वापरव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका 10 मजली इमारतीमध्ये खालपासून वरपर्यंत भीषण आग लागली असून, ती विझवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतोय. ड्रोनला पाणी किंवा गॅस असलेल्या पाईपला जोडण्यात आले आहे, ज्यातून समोरून पाणी किंवा वायू बाहेर पडत आहेत. हे ड्रोन हवेत उडून इमारतीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर खाली अग्निशमन दलाचे जवान उभे राहून ड्रोन नियंत्रित करत आहेत. 

IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओया तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अत्यंत भीषण आगही सहज विझवता येते आणि त्यात जीवाला धोका नसतो. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, कारण क्वचितच कोणी ड्रोनने इमारतीला लागलेली आग विझवताना पाहिले असेल. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'फायर ब्रिगेड जुनी झाली आहे, आता ड्रोन फायर फायटरचे युग आले.' 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेfireआग