लिफ्टमधेच झाला असता कुत्र्याचा मृत्यू, जर ही व्यक्ती आली नसती; CCTV मध्ये रेकॉर्ड झालं सगळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:39 IST2021-11-05T17:37:04+5:302021-11-05T17:39:35+5:30

Social Viral : साउथ चायना मॉर्निंग पोस्ट द्वारे यूट्यूबवर पोस्ट करण्यात आलेल्या क्लिपमध्ये कुत्र्याला तुम्ही लिफ्टकडे धावत जाताना बघू शकता. अशात त्याचा गळ्यातील पट्टा दरवाज्यात अडकतो.

Viral video : Dog would have died in lift if man did not come on the spot watch cctv | लिफ्टमधेच झाला असता कुत्र्याचा मृत्यू, जर ही व्यक्ती आली नसती; CCTV मध्ये रेकॉर्ड झालं सगळं

लिफ्टमधेच झाला असता कुत्र्याचा मृत्यू, जर ही व्यक्ती आली नसती; CCTV मध्ये रेकॉर्ड झालं सगळं

Viral Video: तसे तर सोशल मीडियावर सतत व्हिडीओ व्हायरल होत असातत. पण एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात एका डिलिव्हरी एजंटच्या तप्तरतेमुळे एका कुत्र्याचा जीव वाचला आहे. कारण एका कुत्र्याचा गळ्यातील पट्टा लिफ्टमध्ये अडकला होता. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट द्वारे यूट्यूबवर पोस्ट करण्यात आलेल्या क्लिपमध्ये कुत्र्याला तुम्ही लिफ्टकडे धावत जाताना बघू शकता. अशात त्याचा गळ्यातील पट्टा दरवाज्यात अडकतो.

लिफ्टच्या आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही खतरनाक घटना कैद झाली आहे. जशी लिफ्ट सुरू होते, पट्टा अडकल्याने कुत्रा आपोआप छताकडे खेचला जातो. अशात कुत्रा आपला जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. पण सुदैवाने वरच्या मजल्यावर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी एजंटने कुत्र्याला पट्ट्याला लटकलेलं पाहिलं. 

डिलिव्हरी एजंटने जराही वेळ न घालवता लगेच लिफ्टजवळ गेला आणि त्याने लगेच कुत्र्याला वाचवलं. काही सेकंदात त्याने कुत्र्याला आपल्या जवळ घेतलं आणि त्याच्या गळ्यातील पट्टा काढून टाकला. हा व्हिडीओ अपलोड केल्यावर व्हायरल झाला आहे.

लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर या डिलिव्हरी एजंटचं कौतुक केलं आहे. एक यूजर म्हणाला की, 'हा माणूस एक खरा हिरो आहे. मला हे जाणून घ्यायचंय की, काय मालकाने त्याला काही मोठं बक्षीस दिलंय. जर नसेल दिल, तर त्याला बक्षीस म्हणून काहीतरी द्यायला हवं'.
 

Web Title: Viral video : Dog would have died in lift if man did not come on the spot watch cctv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.