वाह रे पठ्ठ्या! जुगाड करून तयार केलं स्कूटी आणि सायकलचं कॉम्बिनेशन, पोलिसही झाले हैराण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 17:15 IST2021-07-26T17:12:20+5:302021-07-26T17:15:06+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्तीने स्कूटी आणि सायकलच्या अनोख्या कॉम्बिनेशनने एक भारी वाहन तयार केलं आहे.

वाह रे पठ्ठ्या! जुगाड करून तयार केलं स्कूटी आणि सायकलचं कॉम्बिनेशन, पोलिसही झाले हैराण....
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आकाशाला भिडणाऱ्या या महागाईला लोक वैतागले आहेत. अशात भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. लोक वेगवेगळे जुगाड करून आपलं रोजचं जीवन जगतात आणि जीवनात एक वेगळी मजा आणतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने जुगाडा एक अनोखा नमुना सादर केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका व्यक्तीने स्कूटी आणि सायकलच्या अनोख्या कॉम्बिनेशनने एक भारी वाहन तयार केलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हे वाहन विना पेट्रोल चालतं. म्हणजे याने स्कूटी चालवल्याची हौसही भागते. (हे पण बघा : आरारारारा खतरनाक! साडीतच घेतली इमरजन्सी एक्झिटमधून एंट्री, महिलेच्या जुगाडूपणाचं कौतुक..)
पुलिस को धोखा देने की 'निंजा टेक्निक' pic.twitter.com/r9WAi6dR61
— @kumarayush (@kumarayush084) July 25, 2021
व्हिडीओत बघू शकता की, व्यक्तीने त्याच्या सायकलच्या पुढच्या भागात स्कूटीची पुढची बॉडी लावली आहे. या खास वाहनावरून तो रस्त्यावरून जात आहे. हे खास वाहन पाहून हे समजत नाहीये की, याला नेमकं नाव काय द्यायचं. हे वाहन इतकं खास आहे की, पोलिसांनीही या व्यक्तीला थांबवून त्याच्या वाहनाचा फोटो काढला. हा व्हिडीओ पाहून लोक व्यक्तीचं आणि त्याच्या खास जुगाडाचं कौतुक करत आहेत.