DJ च्या तालावर थिरकत होते वर-वधू, इतक्यात घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का! पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 11:59 IST2022-11-03T11:59:05+5:302022-11-03T11:59:25+5:30

सोशल मीडियावर लग्न समारंभाशी संबंधित व्हिडिओ पाहणं नेटिझन्सना खूप आवडतं. विशेषत: वधू-वरांच्या व्हिडिओंची तर सोशल मीडियात चांगलीच चलती असते.

viral video desi bride and groom were dancing on floor suddenly sound box fell on dulha left everyone shocked | DJ च्या तालावर थिरकत होते वर-वधू, इतक्यात घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का! पाहा Video

DJ च्या तालावर थिरकत होते वर-वधू, इतक्यात घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का! पाहा Video

सोशल मीडियावर लग्न समारंभाशी संबंधित व्हिडिओ पाहणं नेटिझन्सना खूप आवडतं. विशेषत: वधू-वरांच्या व्हिडिओंची तर सोशल मीडियात चांगलीच चलती असते. कधी नववधू तिच्या हटके स्टाईलनं नेटिझन्सची मनं जिंकतं, तर कधी जोडपं त्यांच्या धमाकेदार डान्स व्हिडिओंनी इंटरनेटवर वर्चस्व गाजवताना दिसतात. पण आता समोर आलेला व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये वधू-वर डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत. तेव्हाच असा काही अपघात होतो ते पाहून लोक आरडाओरडा करुन लागतात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वधू आणि वर डान्स फ्लोअरवर उभे असल्याचं दिसत आहे. डीजेवर मोठ्या आवाजात गाणी सुरू आहेत. वर आपल्या वधूचा हात धरून डीजेच्या तालावर नाचणार इतक्यातच मागून एक मोठा साउंड बॉक्स त्याच्या पाठीवर पडतो. अचानक झालेल्या या अपघातानंतर वऱ्हाड्यांनाही धक्का बसतो. त्याच वेळी, वधू देखील खूप घाबरते. या दरम्यान कुटुंबीय लगेच वराकडे धावतात. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र हा व्हिडिओ ज्यानं पाहिला तो थक्क होत आहे.

लग्न समारंभाचा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. काहींना हा व्हिडिओ मजेदार देखील वाटत आहे. स्माईली इमोजीसह लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ gyanendra_703 नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओला जवळपास ६ हजार लोकांनी लाइक केलं आहे.

Web Title: viral video desi bride and groom were dancing on floor suddenly sound box fell on dulha left everyone shocked